Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबईतील ड्रग रॅकेटमध्ये पोलिसांचा सहभाग? बिल्डर गुरुनाथ चिचकर आत्महत्या प्रकरणात नवीन वळण

बिल्डर गुरुनाथ चिचकर यांनी स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. आता या प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. या प्रकरणात ड्रॅग रॅकेटमध्ये पोलिसांचा सहभाग आहे असे बोलले जात आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 28, 2025 | 10:11 PM
नवी मुंबईतील ड्रग रॅकेटमध्ये पोलिसांचा सहभाग? बिल्डर गुरुनाथ चिचकर आत्महत्या प्रकरणात नवीन वळण

नवी मुंबईतील ड्रग रॅकेटमध्ये पोलिसांचा सहभाग? बिल्डर गुरुनाथ चिचकर आत्महत्या प्रकरणात नवीन वळण

Follow Us
Close
Follow Us:

सावन वैश्य /नवी मुंबई: बिल्डर गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्या नंतर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी विशेष तपासणी पथकाची नेमणूक केली होती. चिचकर यांच्या दोन मुलांवर नार्कोटीक विभागाकडून चौकशी सुरू होती. चिचकर यांच्या दोन मुलांसह चार जण फरार असल्याने नारकोटीक विभागाकडून चिचकर यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचे, चीचकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटल्यावर त्या दिशेने तपास करत असताना विशेष पथकाने मुख्यसूत्रधार कमलकुमार चंदवाणी उर्फ केके, सचिन भालेराव व संजय फुलकर या तीघांना अटक केली आहे.

Pahalgam Terror Attack: “विजय वडेट्टीवार यांनी निर्लज्जपणाचे…”; शिवसेनेचे मुंबईत जोरदार आंदोलन

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे नशा मुक्त नवी मुंबई अभियान प्रभावीपणे शहरात राबवली जावे यासाठी मोर्चे बांधणी करून, विविध ठिकाणी छापेमारी करत अमली पदार्थ जप्त करण्याचं काम करत आहेत. तर राजाच्या सैन्य दलातील काही शिपाईच राज्याच्या आदेशाच्या विरोधात काम करताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी विकासक गुरुनाथ चिचकर यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांच्या नारकोटीक विभागाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं चिचकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई करून चिचकर यांच्या दोन मुलांसह चार जणांकडे चौकशी सुरू केली होती. मात्र चौघेही फरार झाल्याने नार्कोटिक पथक गुरूनाथ चिंचकर यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप चिचकर यांनी सुसाईड लॉटमध्ये केला होता. त्यानुसार आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या प्रकरणाच्या तपासणीसाठी विशेष चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशी समितीने सखोल तपास केल्यावर या प्रकरणात सचिन भालेराव व संजय फुलकर यांचा सहभाग असल्याची माहिती मिळाल्यावर, विशेष तपास पथकाने गावी पळून गेलेल्या सचिन भालेराव तसेच संजय फुलकर याला अटक केली आहे.

मुंबई ते अहमदाबाद प्रवास फक्त 2 तासात, ‘या’ तारखेला सुरू होणार हायस्पीड ट्रेन; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्येनंतर विशेष पथकाने केलेल्या तांत्रिक तपासाच्या आधारावर मिळालेल्या माहितीवरून, कमलकुमार चंदवानी उर्फ केके आणी सचिन भालेराव यांचे अनेक वेळा फोनवर संभाषण झाले होते. तसेच भालेराव हा कमलकुमार चंदवानी उर्फ केके याच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने भालेराव याचे हात देखील या प्रकरणात बरबटले असल्याने पोलिसांनी दोघा जणांना ही अटक केली आहे. सचिन भालेराव हा सध्या खारघर पोलिसात नेमकीनूस आहे. चिचकर यांच्या मुलाकडून परदेशातून आणलेल्या पदार्थाची कन्साईन पोहोचवण्याचा नियोजन हे पोलीस करत होते. याबद्दल त्यांना दरमहा पंधरा लाख रुपये मिळत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हायड्रो गांजा प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक निगडे व त्यांच्या पथकाने 14 एप्रिल रोजी नेरुळ कारवाई केली होती. यामध्ये गुरूनाथ चिचकर यांचा मुलगा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला होता. आज देखील परदेशातून आलेला ५ करोड रुपयांचा हायड्रो गांजा पोलिसांनी नवी मुंबईतून हस्तगत केला आहे. अशातच सचिन भालेराव व संजय फुलकर यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Navi mumbai crime gurunath chichkar suicide case two police officers are involved in drug racket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 09:20 PM

Topics:  

  • Narcotest
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

BMC Election 2025 : नवी मुंबई- ठाणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटणार? शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष
1

BMC Election 2025 : नवी मुंबई- ठाणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटणार? शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत स्पाच्या आड वेश्याव्यवसाय उघडकीस; नेपाळ, थायलंडमधून आणल्या मुली आणि…
2

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत स्पाच्या आड वेश्याव्यवसाय उघडकीस; नेपाळ, थायलंडमधून आणल्या मुली आणि…

Navi Mumbai Crime: नवी मुंबई हादरलं! चारित्र्याच्या संशायावरून वाद विकोपला आणि…; पतीनेच केली पत्नीची निर्घृण हत्या
3

Navi Mumbai Crime: नवी मुंबई हादरलं! चारित्र्याच्या संशायावरून वाद विकोपला आणि…; पतीनेच केली पत्नीची निर्घृण हत्या

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश
4

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.