विजय वडेट्टीवारांविरोधात शिवसेनेचे आंदोलन (फोटो - सोशल मिडिया)
मुंबई: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पिडित कुटुबियांबाबत संवेदनाहीन वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार विरोधात आज शिवसेनेने बाळासाहेब भवन येथे जोरदार आंदोलन केले. पर्यटकांच्या अनुभवावर शंका उपस्थित करणाऱ्या आणि दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या वडेट्टीवार याने ताबडतोब माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात आमदार डॉ. मनीषा कायंदे, शायना एन.सी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होते.
वडेट्टीवार आणि काँग्रेसचा निषेध करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली. आमदार डॉ. कायंदे म्हणाल्या की, विजय वडेट्टीवार यांनी निर्लज्जपणाचे वक्तव्य केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांतील सदस्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. पहलगाम हल्ल्यात बचावलेल्या कुटुंबियांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या वडेट्टीवार यांचे डोकं ठिकाणावर आहे का, असा सवाल आमदार डॉ. कायंदे यांनी उपस्थित केला. वडेट्टीवार यांनी ताबडतोब माफी मागितली पाहिजे, अशी मागणी आमदार कायंदे यांनी केली. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आमदार डॉ. कायंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.
वडेट्टीवारांपूर्वी काँग्रेसच्या विविध नेत्यांनी दहशतवाद्यांना पाठराखण करणारी वक्तव्य केली असल्याचे डॉ. कायंदे म्हणाल्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या, कर्नाटकचे मंत्री आर.बी थिम्मापूर, सैफुद्दीन सोज, तारिख हमीद करा, रॉबर्ट वड्रा या पाकधार्जिणी मंडळींनी भारतीय कुटुंबियांचा अपमान केला. काँग्रेसवाल्यांना पर्यटकांच्या डोळ्यांतील अश्रू पाहावले नाहीत, म्हणून या नेत्यांनी निर्लज्ज वक्तव्ये केलीत. एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये जाऊन पर्यटकांना सुखरुप महाराष्ट्रात आणण्याचे काम केले तर काँग्रेस नेत्यांनी या कुटुंबियांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले, असे डॉ. कायंदे म्हणाल्या.
सिंधी समाजातील लोकांना देखील सोडवा लागणार का भारत?
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एकवाक्यता नसल्याचे म्हणत विरोधकांनी टीकेची झोड उठवली. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “बऱ्याच नेत्यांना वेगवेगळी अधिकारी माहिती देत असतात. त्यानुसार नेते वक्तव्य करुन मते मांडत असतात. केंद्र सरकारच्या आदेशानंतर ज्या पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडायला हवा अशा नागरिकांची आम्ही यादी तयार केली आहे. त्यानुसार लोकांची ओळख पटवण्यात आली आहे. कोणतीही व्यक्ती त्यातून सुटलेली नाही. यादीमध्ये असलेल्या सर्वांना बाहेर पाठवले जाणार आहे,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सिंधी समाजातील लोकांना देखील सोडवा लागणार का भारत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
पुढे ते म्हणाले की, “केंद्र सरकारने आदेश दिल्यानंतर आम्ही राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना शोधण्यास सुरुवात केली. त्यांच्यापर्यंत केंद्र सरकारचा निरोप पोहचवून त्यांना देश सोडण्यास सांगितले. राज्यातील पोलीस हे यादीतील सर्व लोक बाहेर जात आहेत की नाहीत यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या हालचाली ट्रॅक करत आहोत. याबाबत अंतिम आकडेवारी समोर आली की जाहीर केली जाईल. बऱ्याच वेळा आकडेवारीमुळे गोंधळ होत असतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अंतिम आकडेवारी देऊ. सर्व पाकिस्तानी लोकांना राज्याबाहेर आणि देशाबाहेर काढल्यानंतर त्याची आकडेवारी देखील आम्ही जाहीर करु,” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.