Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bus Driver Attacked : “हाता पाया पडूनही गुंड थांबले नाहीत!” चाकणमध्ये भररस्त्यात एसटी बस अडवून चालकाला बेदम मारहाण अन्…

Bus Driver Attacked : पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या एसटी बसचा मार्ग अडवून दोन तरुणांनी घातला धुमाकूळ! प्रवाशांनी हात जोडले, गयावया केली, पण चालकाला निर्घृण मारहाण सुरूच... चाकणमध्ये भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेने कायदा-सुव्यवस्थेचे वाजले बारा!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 11, 2026 | 01:18 PM
Bus Driver Attacked : "हाता पाया पडूनही गुंड थांबले नाहीत!" चाकणमध्ये भररस्त्यात एसटी बस अडवून चालकाला बेदम मारहाण अन्...

Bus Driver Attacked : "हाता पाया पडूनही गुंड थांबले नाहीत!" चाकणमध्ये भररस्त्यात एसटी बस अडवून चालकाला बेदम मारहाण अन्...

Follow Us
Follow Us:
  • चाकणमध्ये २ दुचाकीस्वारांनी एसटी चालकाला बेदम मारहाण केली
  • प्रवाशांनी गयावया केली, तरी गुंडांनी मारहाण सुरूच ठेवली
  • परिसरात संताप; आरोपींवर कडक कारवाईची मागणी
Bus Driver Attacked : पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. भरदिवसा आणि मध्यवर्ती महामार्गावर दोन दुचाकीस्वारांनी थेट एसटी बस अडवून चालकाला निर्घृणपणे मारहाण केल्याची थरारक घटना घडली आहे. प्रवाशांनी हात जोडून वारंवार विनवणी केली, तरीही या गुंडांनी चालकाला तुडवणे सुरूच ठेवल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा: Crime News: “शाखाप्रमुख पद मिळवून दिलं म्हणून थेट खल्लास?” मध्यरात्री थरार; नगरसेवकाच्या पुतण्याने पाठीत खुपसला चाकू!

भररस्त्यात बस अडवली अन् चालकावर तुटून पडले

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणारी एसटी बस अनेक प्रवाशांना घेऊन चाकण परिसरातून जात होती. याच दरम्यान, दोन तरुणांनी आपल्या दुचाकीने भररस्त्यात बसचा मार्ग अडवून ती थांबवण्यास भाग पाडले. गाडी थांबताच हे दोन्ही तरुण तणतणत बसमध्ये घुसले आणि चालकाशी क्षुल्लक कारणावरून हुज्जत घालू लागले.

वाद वाढताच दोन्ही तरुणांनी प्रवाशांच्या देखत बसचालकाला थेट हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. चालत्या बसमधील प्रवाशांसमोर घडणारा हा भयंकर प्रकार पाहून बसमधील महिला आणि नागरिक पुरते हादरून गेले.

हेही वाचा: Theft News: पहाटे महिला काकड आरतीला गेली अन् …सीसीटीव्हीतील दृश्याने पोलिसांची चक्रं फिरवली!

प्रवाशांच्या विनवणीलाही जुमानले नाही

चालकाला होणारी निर्घृण मारहाण पाहून बसमधील प्रवाशांनी पुढे होऊन त्या तरुणांना थांबवण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रवाशांनी हात जोडून मारहाण करणाऱ्या तरुणांकडे विनवणी आणि गयावया केली. मात्र, डोक्यात संताप गेलेल्या त्या गुंडांनी प्रवाशांच्या विनंतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत चालकाला तुडवणे सुरूच ठेवले.

भरदिवसा आणि गजबजलेल्या महामार्गावर घडलेल्या या प्रकारामुळे चाकण परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. ऐन प्रवासात चालकावर झालेल्या या भ्याड हल्ल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला आहे. या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांवर चाकण पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी तीव्र मागणी आता नागरिक व कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा प्रकार पुणे-नाशिक महामार्गावर कुठे घडला?

    Ans: हा धक्कादायक प्रकार चाकण परिसरात घडला.

  • Que: तरुणांनी एसटी बस चालकाला मारहाण का केली?

    Ans: दोन दुचाकीस्वारांनी बस अडवून चालकाशी हुज्जत घातली आणि प्रवाशांच्या देखत त्याला बेदम मारहाण केली.

  • Que: घटनेनंतर प्रवाशांची काय प्रतिक्रिया होती?

    Ans: प्रवाशांनी गुंडांना हात जोडून मारहाण थांबवण्याची विनवणी केली, मात्र आरोपींनी चालकाला मारहाण सुरूच ठेवली.

Web Title: Pune nashik highway chakan st bus driver attacked hooligans sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Attack
  • Crime . Crime News
  • st bus news

संबंधित बातम्या

Crime News: “शाखाप्रमुख पद मिळवून दिलं म्हणून थेट खल्लास?” मध्यरात्री थरार; नगरसेवकाच्या पुतण्याने पाठीत खुपसला चाकू!
1

Crime News: “शाखाप्रमुख पद मिळवून दिलं म्हणून थेट खल्लास?” मध्यरात्री थरार; नगरसेवकाच्या पुतण्याने पाठीत खुपसला चाकू!

 Drowning Case: पोलिसांची गाडी पाहून तलावात मारल्या उड्या? ३ तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; एकाची झुंज सुरू, चौकशीचे आदेश!
2

 Drowning Case: पोलिसांची गाडी पाहून तलावात मारल्या उड्या? ३ तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; एकाची झुंज सुरू, चौकशीचे आदेश!

Suicide News: “बाबांनी फोन घेऊन दिला नाही म्हणून…” नालासोपाऱ्यातील वाकणपाड्यात खळबळ; ऐन दिवाळीत तरुणानं उचललं भयंकर पाऊल!
3

Suicide News: “बाबांनी फोन घेऊन दिला नाही म्हणून…” नालासोपाऱ्यातील वाकणपाड्यात खळबळ; ऐन दिवाळीत तरुणानं उचललं भयंकर पाऊल!

Dharashiv: “पुण्याहून सणाला घरी आली अन्…” फटाक्यांच्या की शॉर्ट सर्किटच्या ठिणगीने घेतला ६ जणांचा बळी; गावकऱ्यांनी JCB ने…
4

Dharashiv: “पुण्याहून सणाला घरी आली अन्…” फटाक्यांच्या की शॉर्ट सर्किटच्या ठिणगीने घेतला ६ जणांचा बळी; गावकऱ्यांनी JCB ने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.