नवी मुंबई /सावन वैश्य: वाशी सेक्टर 14 येथील एमजी कॉम्प्लेक्स मधील, रहेजा इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आग लागली. रात्री साडेबारा वाजता लागलेल्या या आगीत 80 वर्षीय वृद्ध महिला, सहा वर्षे चिमुरडी व तिच्या आई-वडिलांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर कामोठेत देखील आगीच्या घटनेत माय लेकीला मृत्यूने कवटाळल आहे. कामोठे सेक्टर 36 मधील अंबे श्रद्धा सोसायटी देखील पहाटेच्या सुमारास झालेल्या सिलेंडर ब्लास्ट मध्ये, दोघींचा होरपळून मृत्यू झाला आहे. एन दिवाळीच्या सणात नवी मुंबईतील या दोन वेगवेगळ्या म्हणजेच वाशीमध्ये 4 आणि कामोठेमध्ये 2 असं आगीच्या घटनेत एकूण 6 जणांचा बळी घेतला आहे.
ऐन दिवाळीच्या सणादिवशी संपूर्ण संपूर्ण नवी मुंबईला हेलावून टाकणारी घटना घडली आहे. नवी मुंबईत दोन ठिकाणी घडलेल्या आगेच्या घटनेत, एकूण 6 जणांचा जीव गेला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास वाशीतील एमजी कॉम्प्लेक्स मधील, रहेजाडा रेसिडेन्सीच्या दहाव्या मजल्यावर आग लागली होती. या आगीने रौद्ररूप धारण केलं. कॉम्प्लेक्सच्या दोन मजल्यांवर आगीने वेढा घातला. यामध्ये कमला हिरालाल जैन, वय 84 वर्ष, सुंदर बालकृष्णन, वय 44 वर्ष, पूजा राजन, वय 39 वर्षे, व वेदिका बालकृष्णन, वय 6 वर्ष, या चौघांचा यात मृत्यू झाला. आगीची घटना कळताच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ, रबाळे, ऐरोली, या परिसरातून अग्निशमन दलाच्या 5 ते 7 गाड्या तर पनवेल महानगरपालिका व एमआयडीसीच्या प्रत्येकी 1 गाड्या अशा जवळपास 7 ते 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी 5 ते 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना फोर्टिस हिरानंदानी व एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे.
या घटनेची माहिती मिळताच ठाणे लोकसभेचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेत शोक व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालीचे पालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी dekhil घटनास्थळाचा आढावा घेत घटनेची माहिती घेतली. सदरची घटना कोणत्या कारणामुळे घडली किंवा कोणत्या त्रुटी या घटनेला जबाबदार आहेत का, याचा शोध घेण्याच्या सूचना यावेळी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शहर अभियंता शिरीष अरदवाड, नवी मुंबई अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव उपस्थित होते. या रहिवासी संकुलात दुतर्फा वाहन पार्किंग असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला होता. ही बाब देखील आयुक्तांनी गांभीर्याने घेत रहिवासी संकुलाला पार्किंगबाबत नियोजन करण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत.
कामोठे सेक्टर 36 मधील अंबेश्रद्धा सोसायटी देखील पहाटेच्या दरम्यान सिलेंडर स्फोट होऊन आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व कामोठे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. व नागरिकांना लगेच सुरक्षित स्थळी हलवले. त्यामुळे इतर नागरिकांचे जीव वाचले. मात्र या स्फोटामुळे साखर झोपेत असलेल्या मायलेकींचा यात होरपळून मृत्यू झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की काही क्षणातच संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडले. या दुर्घटनेत आई व मुलीच्या झालेल्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही मोठी दुर्घटना आहे. मी घटनास्थळाची पाहणी केली. दहाव्या मजल्यावर वृद्ध महिलेचा व 12 व्या मजल्यावरील एका कुटुंबाचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने घटनाचा पंचनामा केल्यावर आगीच नेमकं कारण स्पष्ट होईल. तसेच वाहन पार्किंगमुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे याबाबत रहिवासी संकुलाला वाहन पार्किंग बाबत नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. जेणेकरून भविष्यात असा प्रसंग पुन्हा उद्भवणार नाही.
डॉ. कैलास शिंदे (आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका)
रात्री 12:30 च्या दरम्यान या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर अचानक आग लागली. या आगीची तीव्रता 11 व 12 मजल्या पर्यंत गेली. अचानक लागलेल्या आगीमुळे धुर मोठ्या प्रमाणात झाल्याने, 11 व 12 मजल्यावरील नागरिकांना त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तीनही मजल्यावरील जवळपास 14 लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला आहे.
आदिनाथ बुधवंत (सहाय्यक पोलीस आयुक्त)
आगीत जखमी व मयत झालेल्यांची यादी खालील प्रमाणे.
जखमी- हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटल-
रहेजा रेसिडेन्सी रूम नं. 1106
1) मानबेंद्र भीमचरण घोष वय- 69 वर्षे
2) मलिका मानबेंद्र घोष वय- 58 वर्षे
3) रितिका मानबेंद्र घोष वय- 39 वर्षे
जखमी- MGM हॉस्पीटल, वाशी
रहेजा रेसिडेन्सी रूम नं. 1005
1) भावना महावीर जैन व 49 वर्षे..
2) महावीर हिरालाल जैन वय 51 वर्षे
3) क्रिश महावीर जैन वय 21 वर्षे
गोविंद कॉम्प्लेक्स रूम नं. 1103
4) निर्मल हिरालाल जैन, वय 53 वर्षे
5) मेहुल हिरालाल जैन वय 32 वर्षे
रहेजा रेसिडेन्सी, रूम नं. 1105
1) दमयंती हेमचंद्र अग्रवाल वय- 80 वर्ष
2) सुमंती जॉन टोपणो वय 18 वर्षे
मयत- MGM हॉस्पीटल
1) वेदिका सुंदर बालकृष्णन वय- 06 वर्ष,
रहेजा रेसिडेन्सी, रूम नंबर 1205
मयत- मनपा हॉस्पिटल वाशी
1) कमला हिरालाल जैन, वय- 84 वर्षे
रहेजा रेसिडेन्सी, रूम नं. 1105
1) सुंदर बालकृष्णन वय- 44 वर्षे
2) पूजा राजन वय- 39 वर्षे
रहेजा रेसिडेन्सी, रूम नंबर 1205 या दुर्देवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.