माजी नगरसेवकाविरुद्ध बलात्कार व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल (फोटो सौजन्य-X)
सावन वैश्य, नवी मुंबई: दिघ्यातील ज्येष्ठ नगरसेवक रामआशिष यादव यांच्या विरोधात एका महिलेने बलात्कार व ॲट्रॉसिटी चा गुन्हा रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. पीडित महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने नवी मुंबई परिसरात विविध ठिकाणी शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे.
राम आशिष यादव हे माजी नगरसेवक असल्याने त्यांचा सामाजिक कार्याशी जास्त संबंध आहे. अशातच एका महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने रामआशिष यादव यांनी पीडित महिलेवर, महापे व नवी मुंबईतील वेगवेगळ्या लॉजवर तसेच महिलेच्या घरी जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातूनच अनेक वेळा गर्भधारणा राहिल्याने जबरदस्तीने औषध देऊन गर्भपात देखील केला. अशातच महिलेने एका मुलाला जन्म दिल्याने यादव यांनी त्या मुलाचा स्वीकार न करता पीडित महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. शेवटी पीडित महिलेने माजी नगरसेवक रामआशिष यादव यांच्या विरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्कार व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपनिरीक्षक राहुल गरड करत आहेत.
बातमी अपडेट होत आहे..