Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारणाऱ्या अमजद शेख नावाच्या आरोपीने ताब्यात असताना ब्लेडने स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आरोपीचा जीव वाचला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 13, 2026 | 12:00 PM
नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
Follow Us
Follow Us:

सावन वैश्य, नवी मुंबई:  नेरुळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिम परिसरात पोलिसांना धारदार सुरा उगारून धमकावणाऱ्या आरोपीने ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांसमोरच ब्लेडने स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आरोपीचा जीव वाचला. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमजद अब्दुल मुस्तफा शेख (वय ३१, रा. सेक्टर-२०, नेरुळ) याने शनिवारी (११ जुलै) दुपारी सुमारे १२.५० वाजण्याच्या सुमारास नेरुळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूस राजहंस वाईन शॉपसमोरील मोकळ्या जागेत हातातील धारदार लोखंडी सुरा उगारून पोलीस कर्मचाऱ्यांना धमकावले. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र फिरवत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

अहिल्यानगरमध्ये ‘विद्रोही’चे दोन दिवसीय ‘नवसमाजमाध्यम’ शिबिर उत्साहात संपन्न; नवमाध्यमांचा लोकशाहीसाठी प्रभावी वापर करण्याचे आवाहन

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाडसाने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीने अचानक ब्लेडने स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित पोलिसांनी तत्काळ प्रसंगावधान राखत त्याला रोखले आणि तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

यापूर्वीही संबंधित आरोपीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्याने त्या आदेशाचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. पोलीस कर्मचारी विलास माणिक चव्हाण यांच्या फिर्यादीवरून नेरुळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन पाटील पुढील तपास करीत आहेत.

कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत असणार मुदत

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी नेरुळ रेल्वे स्थानक परिसरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. स्थानकाजवळील वाईन शॉपबाहेर उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांची नियमित गर्दी होत असल्याने महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. वारंवार तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने अशा घटनांना खतपाणी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक परिसरात नियमित पोलीस गस्त वाढविणे, उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणे आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Nerul railway station area crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 12:19 AM

Topics:  

  • crime
  • maharashtra

संबंधित बातम्या

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
1

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा
2

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
3

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल
4

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.