
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
दिल्लीत यूपीएससीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामध्ये आता एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. आपण आता पर्यंत अनेक प्रेमी युवकांच्या स्टोरी ऐकल्या आहेत. सक्सेस करताना काय काय कराव लागल हे प्रत्येक जण सांगत असतो. मात्र दिल्लीतल्या या घटनेने तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. दिल्लीत तिमारपूर भागात ५ तारखेला सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. या घटनेत राकेश मीना या तरुणच मृत्यू झाला होता . मात्र जे सत्य बाहेर आल आहे मात्र भयानक होत. या प्रकरणात अमृता चौहान आणि सुमित कश्यप याला अटक करण्यात आली आहे. अमृत चौहान ही त्याची प्रेयसी आहे. मात्र प्रेयसीने कसा कट रचला ते वाचा.
घरात प्रियकराला जिवंत जाळल ?
रामकेश आणि अमृता यांचे मे २०२५ पासून संमतीने संबंध होते. या संबंधात त्याने आणि तिने काही अश्लील फोटो आणि वीडियो काढले होते. तो त्याने डिलीट करायला नकार दिला होता. या रागातून तिने त्याचा काटा काढायचा ठरवलं आणि जुन्या बॉयफ्रेंडच्या मदतीने दोन जणांनी त्याचा गळा आवळून खून केला आणि नंतर पेट्रोल टाकून आग लावून दिली. जेणेकरून घरात स्फोट झाला आहे अस भासवल जाव. मात्र घरात पोलिस तपासात समोर ते मात्र भयानक होत. पोलिस तपासात अमृता चौहान हिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
जुना बॉयफ्रेंड सिलिंडरवाला
अमृता आणि सुमित याने प्लानिंग करून गेम केला. रामकेश हा दिल्लीत यूपीएससीची तयारी करायचा. ५ तारखेला दोन जण त्याच्या घरात तोंड बांधून गेले. गळा दाबून त्याचा खून केला मात्र खून केल्यानंतर घरात वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या त्यावरून पोलिसानं संशय आला. अमृत चौहान हिला ताब्यात घेतल्यावर सगळ काही बाहेर आल. जुन्या बॉयफ्रेंड सोबत तिला पुन्हा यायचं होत का ? संबंध असताना हत्या का केली याचा तपास पोलिस करत आहेत. घरात सिलिंडरचा स्फोट होवून मृत्यू झाला आहे. हे तिला दाखवायचं होत मात्र तो प्रयत्न तिचा असफल ठरला आणि सगळ बिंग बाहेर आल.
Satara Doctor Death Case: डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; दुसऱ्या आत्महत्येशी काय आहे संबंध?