नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका आरोपी कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. आत्महत्या करणाऱ्या कैद्याचे नाव शिवदास भालेराव (वय 58, कैदी क्रमांक यूटी-802) असे आहे. तो सिन्नर तालुक्यातील रहिवासी आहे. त्याने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्याचीच तो शिक्षा भोगत होता. तो जून २०२४ पासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आपली शिक्षा भोगत होता.
Satara Doctor Death Case: डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; दुसऱ्या आत्महत्येशी काय आहे संबंध?
काय घडलं नेमकं?
शिवदास भालेराव याने रविवारी दुपारच्या सुमारास कारागृहातील एका ठिकाणी काश्याच्या तरी साहाय्याने गळफास घेतल्याचे कारागृह प्रशासनाच्या लक्षात आले. याची माहिती मिळताच कारागृहातील पोळी अमलदारांनी तातडीने त्यांना खाली उतरवून शासकीय जिल्हा रुग्णालयात सव्वा तिच्या सुमारास दाखल केले. मात्र तेव्हा वैधकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून कैद्याला मृत घोषित केले.
पोलीस तपास सुरु
या घटनेची माहिती नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. पोलीस आणि कारागृह प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या घटनेमुळे मध्यवर्ती कारागृहात एकाच खळबळ उडाली आहे.
प्रकाश लोंढे टोळीचा हैदोस! युवकावर कोयत्याने हल्ला करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
नाशिक शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका तरुणावर प्राणघातक हल्ला करत टोळक्याने त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तरुणाचे नाव चंद्रकांत विश्वकर्मा नाव आहे. हा प्रकार प्रकाश लोंढे टोळीकडून दहशत माजवण्यासाठी करण्यात आल्याचा उघडकीस आला आहे. याघटनेमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून सातपूर पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे.
कसा केला हल्ला?
नाशिकमधील सातपूर परिसरात चंद्रकांत विश्वकर्मा या युवकावर लोंढेच्या टोळीने अचानक हल्ला चढवला. डोक्यावर कोयत्याने सपासप वार करत, नंतर त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांच्या ताब्यात असूनही गुंडगिरी सुरूच
विशेष म्हणजे, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे टोळीचा मास्टरमाइंड रिपाइंचा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे आहे. ते सध्या पोलिसांच्या ताब्यात असूनही त्यांच्या टोळीची गुंडगिरी सुरुच आहे. हे पाहता, लोंढे टोळी थेट पोलिसांनाच “ओपन चॅलेंज” देत असल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे. सातपूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेत तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकरणामुळे सातपूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आता पोलिसांना या हल्लाखोरांना जेरबंद करण्यात यश कधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Crime News: भाजप नेत्याने कारखाली चिरडून शेतकऱ्याला मारले; अल्पवयीन मुलींचे कपडे फाडले






