डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; दुसऱ्या आत्महत्येशी काय आहे संबंध?
या महिलेनं केलेल्या आरोपानुसार, तिच्या मुलीच्या सासरच्यांकडून पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी पोलिस तसेच काही राजकीय मंडळींकडून दबाव टाकण्यात आला होता. डॉक्टरवर या प्रकरणात दबाव वाढल्यानेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या नव्या आरोपांनंतर या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस तपासाची दिशा बदलण्याची चिन्हं दिसत आहेत. प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Cyclone Montha : ‘या’ राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, शाळाही बंद… चक्रीवादळ मोंथा कधी आणि कुठे
भाग्यश्री मारूती पंचांगने नावाच्या या महिलेनं काही गंभीर दावे केले आहेत. भाग्यश्री पंचांगने म्हणाल्या की, त्यांच्या मुलीचे दिपालीचे लग्न एका लष्करी अधिकारी जिंक्य हणमंत निंबाळकर यांच्याशी झाले होते. पण दिपालीच्या सासरच्या मंडळींकडून मुलींवर सातत्याने शारिरीक अत्याचार,मारहाण केली जात होती. एक दिवस आम्हाला मुलीच्या आत्महत्येची बातमी कळाली. मुलीच्या पोस्टमॉर्टेमचा खोटा अहवाल तयार करण्यासाठी संबंधित महिला डॉक्टरवर (डॉ. संपदा मुंडे) दबाव टाकला जात होता.
महिलेनं दावा केला की त्यांच्या मुलीचा म्हणजे दिपालीचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचा पोस्टमॉर्टेम अहवालात नोंदवण्यात आले आहे. दिपालीच्या मृत्यूचा आणि डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का, या दिशेने तपास करण्याची मागणी केली आहे. दीपालीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिची हत्या झाली असल्याचा संशय भाग्यश्री यांनी केला आहे. तसेच अजिंक्य निंबाळकर यांच्या कुटुंबाने राजकीय तसेच पोलिसांच्या संबंधाचा वापर करून दिपालीच्या शवविच्छेदन अहवालात बदल केला, असा आरोपही भाग्यश्री पंचांगने यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दिपालीच्या मृत्यूनंतर तब्बल एक महिन्याने पोलिसांनी तिच्या पोस्टमॉर्टेमचा अहवाल तिच्या कुटुंबियांना दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.






