
बाप की हैवान! डोळे काढण्याचा प्रयत्न अन् शरीरावर अनेक जखमा, 12 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, हत्येचा व्हिडीओ पाठवला आईला
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९:५० वाजता शास्त्री पार्क पोलीस ठाण्यात मुलाच्या हत्येचा अहवाल प्राप्त झाला. शास्त्री पार्क चौक लूपजवळ पोहोचताच, अंदाजे १२ वर्षांचा एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला ताबडतोब जेपीसी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी शास्त्री पार्क पोलिस स्टेशनमध्ये भादंविच्या कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन्सिक टीमने गुन्ह्याच्या ठिकाणी पाहणी केली आणि पुरावे गोळा केले.
वाजिद खान असे ओळखल्या जाणाऱ्या आरोपीला पोलीस ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. वाजिदने त्याचा मुलगा अल्तमसची हत्या केली आणि त्याला जंगलात फेकून दिले. त्यानंतर त्याने मुलाच्या आईला फोन करून घटनेची माहिती दिली. मुलाच्या आईने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तेव्हा त्याने शपथ घेतली आणि नंतर तिला पटवून देण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ पाठवले.
स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचल्यानंतर, मुलाचा मृतदेह झुडुपातून आढळला. शरीरावरील जखमांवरून असे दिसून आले की मुलाला छळून मारण्यात आले होते. त्याचे डोळे काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.
दरम्यान, दिल्लीतील वेलकम परिसरातील एका कॅफेमध्ये झालेल्या खून प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तिमारपूर परिसरात झालेल्या एका छोट्या चकमकीनंतर पोलिसांनी वॉन्टेड आरोपी मुईन कुरेशीला अटक केली आहे. स्पेशल सेलच्या पथकाने पहाटे ही अटक केली. गोळीबारानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिस बऱ्याच काळापासून मुईन कुरेशीचा शोध घेत होते. सध्या, पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत आणि या प्रकरणात आणखी महत्त्वाची माहिती उघड होण्याची आशा आहे.