मुंबईमधून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या गोरेगाव पश्चिम परिसरात एका नामंकित शाळेमध्ये महिला कर्मचाऱ्याकडून ४ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील महिला कर्मचाऱ्यांवर विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे.
बेदम मारहाण करून भावाची हत्या; आईसह वहिणीचीही होती साथ, शवविच्छेदन अहवाल आला अन्…
नेमकं काय घडलं?
मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या गोरेगाव परिसरातील एक नामांकित शाळेमध्ये महिला कर्मचाऱ्याकडून ४ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. चिमुकलीची आजी शाळेतून घरी घेऊन गेल्यावर घरात मुलीचे कपडे बदलताना तिच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. यानंतर आजीने गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. गोरेगाव पोलिसांनी आजीच्या तक्रारीवरून शाळेतील एका महिला कर्मचाऱ्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्या महिलेला अटक केली आहे.
शाळेतील सीसीटीव्ही ताब्यात
अटक केलेली महिला ही किती दिवसांपासून या मुलीचा विनयभंग आणि टॉर्चर केले जात होते याचा तपास पोलीस करत आहे. या संदर्भात गोरेगाव पोलीस शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरा तब्यत घेतले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलींच्या संरक्षणाची बाब ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
“गर्दीचा फायदा घेतला आणि मला चुकीच्या…”, लोकलमध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनीशी गैरवर्तन
महिलांचा लोकल प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबवल्या जातात. याचदरम्यान मुंबई लोकलचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. दादर रेल्वे स्थानकावर एका ६२ वर्षीय आरोपीने लोकलमधील गर्दीचा फायदा घेत लोकलधील १९ वर्षीय तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. डीजी मखाण असे या आरोपीचे नाव आहे. त्यांच्यावर १९ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.
ही घटना १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता घडली. मखाण दिल्लीचे रहिवासी असून तहसीलमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतात. तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर जीआरपी पोलिसांनी त्याला अटक केली
पोलिसांना दिलेल्या माहितीत तरुणीने सांगितले की, “आरोपीने गर्दीचा फायदा घेतला आणि मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.” या घटनेनंतर तरुणीने दादर रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. भारतीय न्यायिक संहितेअंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली. त्याला रेल्वे कोर्ट हजर केले असून कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
Pune crime news : एक कार चोर असाही! दुरस्तीसाठी दिलेल्या मोटारीसह गॅरेज चालकाचा पोबारा; गुन्हा दाखल