crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यातून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेनेच तिच्या दोन दिवसांच्या नवजात बाळाला ५० हजारात विकल्याचे माहिती समोर आली आहे. मुलांचे पालनपोषण करण्यास असमर्थ होती म्हणून हा टोकाचा निर्णय तिने घेतला.
नेमकं काय प्रकरण?
ही घटना सुंदरगढ जिल्ह्यातील कोइडा ब्लॉकच्या पटामुंडा गावात घडली. येथील रहिवासी असलेल्या एका महिलेने तिच्या दोन दिवसांच्या नवजात बाळाला ५० हजार रुपयांत विकल्याचे समोर आले आहे. तिला आधीच २५ हजार रुपये अॅडवान्स मिळाले होते. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती गावकऱ्यांमध्ये पसरली आणि त्यानंतर ती महिला घरातून गायब झाली आणि तिने तिचा मोबाईल सुद्धा बंद केला होता.
बाळ विकण्याचे कारण काय सांगितले
स्थानिक अशा वर्कर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तिचं बाळ दुसऱ्यालाच दिल्याचे तिने स्वतः कबूल केले आहे. घरात आर्थिक अडचण असल्याकारणाने ती तिच्या चार मुलांचे पालनपोषण करण्यास असर्मथ होती. या नाईलाजाने तिने हे टोकाचे निर्णय घेतल्याचे सांगितले. महिलेच्या पतीचं निधन झाल्याचे अंगणवाडीच्या महिला कर्मचाऱ्याने सांगितले. तसेच, तिला आधीच चार मुलं आहेत. तिने तिच्या गरोदरपणाची माहिती दिली असून याबाबत नोंदणी सुद्धा झाली होती, पण ती वारंवार तिचं राहण्याचं ठिकाण बदलत राहिली. अखेर, त्या कर्मचाऱ्याने तिच्या एका आईच्या घरी महिलेच्या राहण्याची व्यवस्था केली आणि तिथून तिला रुग्णालयात पाठवण्यात आलं होत.
महिला यापूर्वी कोईदा मॅटरनिटी वेटिंग होममध्ये कार्यरत असून तिला काही काळानंतर राउरकेला सरकारी रुग्णलयात पाठवण्यात आलं. त्याच रुग्णालयात तिने तिच्या बाळाला जन्म दिला. मात्र, बाळाच्या जन्मानंतर केवळ दोन दिवसांनंतरच महिलेने आपल्या बाळाला विकलं. या प्रकरणी संबंधित महिलेवर कारवाई होणार असून सध्या बाळ नेमकं कुठे आहे. याचा देखील शोध घेतला जात आहे.
IRB जवानाने पत्नीची लोखंडी रॉडने हत्या केली,गॅस सिलेंडरद्वारे घराला आग लावून पुरावे मिटवण्याचा प्रयत्न
केरळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. हत्या केल्यानंतर ही घटना अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. शिव शंकर पात्रा असं आरोपी तरुणाचं नाव असून मृत महिलेचं नाव प्रियंका असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपी हा भारतीय रिजर्व बटालियन (IRB) मध्ये कार्यरत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून ओडिशाच्या कोरापुट टाउमधील ओएमपी कॉलनीत घडल्याचं समोर आलं आहे.