रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे येथे एक धक्कादायक घटना सामोर आली आहे. आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने गावात चर्चा सुरु झाला आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात संशयित भगवान कोकरे महाराज आणि त्याचा सहकारी प्रितेश प्रभाकर कदम यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ही मागील काही दिवसांपासून गुरुकुलात अध्यात्मिक शिक्षण घेण्यस्तही राहत होती. यावेळी गुरुकुलातील प्रमुख असलेल्या भगवान कोकरे महाराज याने अनेकदा तिच्याशी अश्लील वर्तन करत विनय भंग केला असं कंपवयीन तरुणीने तक्रारीत म्हंटले आहे. सुरुवातीला ही घटना घडल्यानंतर पीडितेने गुरुकुलातीलच एका सदस्याला सांगितली होती. त्याने याबाबत कुठे काही बोलू नकोस असे ही म्हंटल्याचे तक्रारीत म्हण्टले आहे. महाराजांची सामाजिक व राजकीय ओळख असून तिला गप्प राहण्यास सांगीतलं. एवढेच नाही तर तिला धमकावण्यात देखील आले असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.
धमकी काय दिली?
महाराजांनी तिला धमकी देखील दिल्याचे समोर आले आहे. याबाबत जर कोणाला काही सांगितले तर कुटुंबात आणि समाजात तुझी बदनामी होईल असेही तिला सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पिडीतेसोबत एकदा नाही तर अनेकदा विनयभंग करण्यात आला. अखेर हा सर्व प्रकार तिच्या कुटुंबियाला समजला. कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या संदर्भात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशांक सणस आणि पोलीस निरीक्षक विवेक आहिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान फक्त आपल्या सोबत नाही तर गुरूकुलात राहणाऱ्या अन्य मुलींसोबतही अशा घटना घडल्याचं पीडित तरूणीने सांगितले आहे.
आरोपींना न्यायालयात केले हजार
या प्रकरणी आरोपी कोकरे आणि कदम यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. धार्मिक संस्थांमध्ये अशा प्रकारची घटना घडल्याने समाजात मोठी खळबळ उडाली आहे.
भास्कर जाधव यांचं काय म्हणणं
भास्कर जाधव यांनी गंभीर आरोप करत म्हंटले की हे प्रकरण एकाच मुलीबरोबर नाही तर अनेक मुलीबरोबर झाली असल्याचे संशय भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे. या महाराजांच्या मठात जे जे नेते आले होते. त्या सर्वांना आस्मान दाखवणार असल्याचा इशारा आमदार भास्कर जाधव यांनी दिला आहे. या प्रकरणातील आरोपी कोकरे हा भाजपच्या पदाधिकारी असल्याचं ही जाधव यांनी सांगितलं आहे.