Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेजाऱ्यांनीच केला गेम! मानखुर्दमध्ये तब्बल साडेनऊ लाख रुपयांची चोरी; पोलिसांकडून तिघांना अटक

पोलिसांच्या तपासात शेजारी राहणारी महिला वैष्णवी गोदरे आणि तिचा पती राहुल गोदरे यांनी त्यांच्या घरात ही चोरी केली असल्याचे समोर आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 29, 2025 | 04:27 PM
शेजाऱ्यांनीच केला गेम! मानखुर्दमध्ये तब्बल साडेनऊ लाख रुपयांची चोरी; पोलिसांकडून तिघांना अटक
Follow Us
Follow Us:

मुंबई: मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात शेजारी राहणाऱ्या एका दाम्पत्याने शेजारच्या घरातच साडेनऊ लाख रुपयांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करत यामध्ये तिघांना अटक केली असून पोलीस त्यांच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत. शिवकुमार रॉय (३८) असे यातील तक्रारदार यांचे नाव असून ते मानखुर्द परिसरात राहतात. १७ मार्चला ते कामावर असताना त्यांच्या पत्नीने त्यांना फोन करत घरात चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी घरी जाऊन पाहणी केली असता, घरातील कपाटात असलेली रोख रक्कम आणि काही सोन्याचे दागिने असा एकूण साडेनऊ लाख रुपयांचा ऐवज लंपास झाला होता.

तिघांना केली अटक

याबाबत त्यांनी तत्काळ ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. पोलिसांनी शिवकुमार राहत असलेल्या इमारतीमधील सर्व सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले. यावेळी शेजारी राहणारी महिला वैष्णवी गोदरे आणि तिचा पती राहुल गोदरे यांनी त्यांच्या घरात ही चोरी केली असल्याचे समोर आले.

चोरीची कबुली, चोरलेला सर्व मुद्देमाल हस्तगत
■ गोदरे यांच्याकडे अनेकदा शिवकुमार यांची पत्नी घराची चावी ठेवून जात होती. याचाच फायदा घेत त्यांनी ही चोरी केली.
■ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी महिलेने हे सर्व दागिने तिच्या आईकडे दिले.
पोलिसांना तिने ही बाब सांगितल्यानंतर पोलिसांनी रिझवाना शेख हिला देखील ताब्यात घेऊन अटक केली आहे.
■ तसेच त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

चेंबूरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

चेंबूरमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेट प्रकरणी मुंबई गुन्हे शाखा युनिट-६ ने दोघांना अटक केली आहे. आफताब आलम रमजान अली अन्सारी आणि हरिलाल बंधू चौधरी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध अनैतिक तस्करी प्रतिबंधक कायदा (पीटा) आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पोक्सो न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह चार मुलींची सुटका केली आहे. आता त्यांना देवनार महिला पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे.

चेंबूरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक; मुलींची केली सुटका

गुन्हे शाखा युनिट-६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांनी सांगितले की, आता ते या रॅकेटशी संबंधित इतर संबंधांची चौकशी करत आहेत आणि तस्करी नेटवर्कमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवत आहेत. मुंबईत अनेक संघटित टोळ्या सेक्स रॅकेट चालवत असल्याचे वृत्त आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार अल्पवयीन मुलींसह तरुणींची तस्करी करून त्यांना विविध हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये पाठवले जाते. एका गुप्त माहितीवरून कारवाई करून, पोलिसांनी एका दलालाचा संपर्क क्रमांक मिळवला आणि बनावट ग्राहकाच्या मदतीने अल्पवयीन मुलींसह मुलींना वेश्याव्यवसायासाठी बोलावले.

Web Title: One couple stolen 9 lakhs jwellery at neighbours home maharashtra nagar mankhurd crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 04:24 PM

Topics:  

  • crime
  • crime news
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…
1

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…

बॅग तपासली अन् ६ गुन्ह्यांची उकल, पिंपरी गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
2

बॅग तपासली अन् ६ गुन्ह्यांची उकल, पिंपरी गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
3

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
4

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.