Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: ‘लिव्ह-इन’मधून जन्मलेल्या बाळाचे तीन व्यवहार; ४८ तासांत चार हातांतून तेलंगणापर्यंत प्रवास

छत्रपती संभाजीनगरमध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाची पैशांसाठी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळाचे तीन व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले असून, ४८ तासांत ते चार हातांतून तेलंगणापर्यंत पोहोचले. पोलिसांनी बाळाला सुरक्षित ताब्यात घेतले असून, बाल कल्याण समितीच्या आदेशाने संस्थेकडे सुपूर्द केले आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 29, 2026 | 03:38 PM
Crime News: ‘लिव्ह-इन’मधून जन्मलेल्या बाळाचे तीन व्यवहार; ४८ तासांत चार हातांतून तेलंगणापर्यंत प्रवास

Crime News: ‘लिव्ह-इन’मधून जन्मलेल्या बाळाचे तीन व्यवहार; ४८ तासांत चार हातांतून तेलंगणापर्यंत प्रवास

Follow Us
Follow Us:
  • बाळाचे तीन व्यवहार; १.२० ते ३.७० लाखांपर्यंत सौदा
  • ४८ तासांत ५०० किमी; चार हातांतून तेलंगणापर्यंत
  • बाळ पोलिसांच्या ताब्यात; संस्थेकडे सुपूर्द
 

छत्रपती संभाजीनगर : जन्मानंतर आई-वडिलांच्या कुशीत सुरक्षितता मिळायला हवी असलेल्या अवघ्या एक महिन्याच्या बाळाची पैशांसाठी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या या बाळाचा जन्मदात्यांनीच सौदा केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यानंतर दलालांच्या माध्यमातून बाळाचे आणखी व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले असून, अवघ्या ४८ तासांत बाळ चार हातांतून फिरल्याची माहिती आहे.

हेही वाचा: खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय

जन्मदात्यांनीच बाळाचा सौदा केल्याचा आरोप

पोलिस तपासानुसार, बाळाच्या पहिल्या व्यवहारात १ लाख २० हजार रुपये देण्यात आल्याचे समोर आले आहे. या पैशांत महागडे मोबाईल आणि सोन्याचे दागिने खरेदी करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, पहिल्या व्यवहारानंतरही बाळाची विक्री थांबली नाही. बाळाला एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे देण्यात आले आणि त्यानंतर त्याची किंमत वाढत गेली. या प्रकरणात बाळाचे तब्बल तीन व्यवहार झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. एका व्यवहारात तब्बल ३ लाख ७० हजार रुपयांची रक्कम समोर आली आहे. त्यामुळे बाळाची विक्री करणारे आणि त्याच्या व्यवहारात सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

संभाजीनगरपासून नांदेडमार्गे तेलंगणापर्यंत प्रवास

बाळाला छत्रपती संभाजीनगरपासून नांदेडमार्गे थेट तेलंगणापर्यंत नेण्यात आले. तब्बल ५०० किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास अवघ्या दोन दिवसांत झाल्याचे तपासातून समोर आले आहे. या काळात बाळाच्या ताब्यात वारंवार बदल करण्यात आला. जन्मानंतर अवघ्या एका महिन्यातच बाळाला वेगवेगळ्या व्यक्तींकडे सोपवण्यात आले. या संपूर्ण प्रकारामुळे बालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा: Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

पोलिसांनी बाळाला घेतले ताब्यात

प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी बाळाच्या विक्रीत सहभागी असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. या व्यवहारातून सोन्या-दागिन्यांसह मोबाईल आणि इतर वस्तू खरेदी केल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी बाळाला सुरक्षितपणे परत आणले. त्यानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार बाळाला संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले आहे. बाळाच्या विक्रीत नेमके कोणकोण सहभागी होते, व्यवहारात किती व्यक्तींचा सहभाग आहे आणि या प्रकरणामागील संपूर्ण साखळी काय आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 

Web Title: One month old baby sale chhatrapati sambhajinagar nanded telangana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • baby names
  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • child trafficking

संबंधित बातम्या

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
1

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Sambhajinagar News : विदेशी नागरिकांची माहिती लपवली तर थेट गुन्हा; हॉटेल-लॉज चालकांना पोलिसांचा इशारा
2

Sambhajinagar News : विदेशी नागरिकांची माहिती लपवली तर थेट गुन्हा; हॉटेल-लॉज चालकांना पोलिसांचा इशारा

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Sambhajinagar News : ४० कोटींच्या मालमत्ता फेर सर्वेक्षणाला ब्रेक; आचारसंहितेमुळे रखडली निविदा प्रक्रिया
4

Sambhajinagar News : ४० कोटींच्या मालमत्ता फेर सर्वेक्षणाला ब्रेक; आचारसंहितेमुळे रखडली निविदा प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.