
पुणे: कामावरुन कमी केल्याने एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दीपक बोबडे (वय ५०, रा. आंबेगाव, कात्रज) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत दीपक बोबडे यांची पत्नी स्वाती (वय ४५) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अजित जाधव, रवींद्र राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती बोबडे यांचे पती एका खासगी कंपनीत कामाला होते. आरोपींनी दिलेला त्रास, तसेच त्यांना कामावरुन कमी केल्याने ते नैराश्यात होते. गेल्या महिन्यात ६ ऑक्टोबर रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असलेल्या एका लाॅजमध्ये दीपक यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्यांची पत्नी स्वाती यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पतीला कामावरुन काढून टाकल्याने ते नैराश्यात होते, तसेच आरोपींच्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी फिर्यादीत केला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.
बाजीराव रस्त्यावरील घटनेनंतरही गुन्हेगारीचे डोके वरच
राज्यासह देशभरातील वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (६ नोव्हेंबर) दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास दत्तनगर, चिंचवड येथे घडली आहे.
छैया पातरे, करण दोढे (विद्यानगर, चिंचवड) आणि त्यांचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय देवप्पा हेळवाळ (१७, दत्तनगर, चिंचवड) असे जखमी अल्पवयीन मुलाचे नाव असून त्याने याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास टाटा शोरुमसमोर, दत्तनगर कमानीजवळ सार्वजनिक रस्त्यावर फिर्यादी आपल्या मित्रासह मोपेडवरून जात होता. त्यावेळी आरोपींनी त्याला रस्त्यात अडवून जुन्या भांडणाच्या कारणावरून कोयत्याने त्याच्या पायावर आणि कमरेवर वार केला. त्यानंतर विद्यानगर येथेही आरोपींनी सीमेंटच्या गट्ट्याने मारहाण करून त्याला गंभीर दुखापत केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.