Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune : खेळाडूंना मोकळं मैदान मिळणार; कर्वेनगर परिसरात टेनिस कोर्ट अन् बास्केट बॉल कोर्ट होणार सुरु

पुण्यातील प्रभाग क्रमांक ३०, कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी परिसरात टेनिस कोर्ट आणि बास्केट बॉल कोर्टचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 13, 2026 | 01:52 PM
खेळाडूंना मोकळं मैदान मिळणार; कर्वेनगर परिसरात टेनिस कोर्ट अन् बास्केट बॉल कोर्ट होणार सुरु

खेळाडूंना मोकळं मैदान मिळणार; कर्वेनगर परिसरात टेनिस कोर्ट अन् बास्केट बॉल कोर्ट होणार सुरु

Follow Us
Close
Follow Us:
  • खेळाडूंना मोकळं मैदान मिळणार
  • टेनिस कोर्ट अन् बास्केट बॉल कोर्ट होणार सुरु
  • लक्ष्मी दुधाने यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३०, कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी या ठिकाणी पुणे महापालिकेच्या माध्यमातून दोन टेनिस कोर्ट विकसित केले आहेत, अशी माहिती नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी दिली. नुकतच तिसऱ्या टेनिस कोर्टचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांच्या शुभहस्ते संपन्न झालेल्या या सोहळ्यामुळे कर्वेनगर परिसरातील नागरिकांमध्ये आणि खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्णाण झाले आहे.

 

नगरसेवक स्वप्निल दुधाने म्हणाले, आपल्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल येथील बास्केट बॉल मैदानाची दुरावस्था झाल्याने अपघात होण्याची संभाव्यता वाढली होती. गेल्या आठ वर्षांपासून अविरतपणे सेवा देणाऱ्या या मैदानाची डागडुजी होणे, काळाची गरज बनले होते. याकरिता आम्ही चार महिन्यांपूर्वी मनपाकडे पाठपुरावा करत ५० लाख रुपये निधी मंजूर करून घेतला असून, टेनिस कोर्टच्या सोबतीने बास्केट बॉल कोर्टच्याही कामाचा शुभारंभ होत आहे.

यामुळे येत्या दोन महिन्यात उत्तम दर्जाचे सिंथेटीक टेनिस कोर्ट आणि बास्केट बॉल कोर्ट साकारत असून, यामुळे प्रभागातील आणि पर्यायाने शहरातील खेळाडू वर्गाला प्रोत्साहन प्राप्त होईल, यात शंकाच नाही. याप्रसंगी माझे सहकारी, पक्षाचे पदाधिकारी, खेळाडू तसेच अनेक नागरिक यांनी उपस्थिती दर्शवत कामाबद्दल भरभरून कौतुक केले. लवकरच सदर प्रकल्प पूर्णत्वास जात असून असेच अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा आमचा मानस असेल, असं यावेळी नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : जीवघेण्या विमान कंपनीवर कारवाई का नको? रोहित पवारांनी उपस्थित केला सवाल

पुणे महापालिका निवडुकीत विजय झाल्यानंतर नगरसेवक स्वप्निल दुधाने नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून दररोज प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या काही महिन्याखाली कर्वेनगरमध्ये दुधाने यांच्या पाठपुराव्यामुळे धनुर्विद्या क्रीडा संकुलाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला होता. आणि आता कर्वेनगर परिसरात टेनिस कोर्ट अन् बास्केट बॉल कोर्ट सुरु होणार असल्यामुळे खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा : जडेजा आणि जयस्वालकडे दुर्लक्ष! हा खेळाडू IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा बनू शकतो नवा कर्णधार

Web Title: Tennis courts and basketball courts are going to be opened in karvenagar area of pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • NCP News
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad : मावळात वनसंपदेची निर्घृण कत्तल; लाकूडतोड्या पुष्पा’वर कठोर कारवाईची मागणी 
1

Pimpri Chinchwad : मावळात वनसंपदेची निर्घृण कत्तल; लाकूडतोड्या पुष्पा’वर कठोर कारवाईची मागणी 

100 व्या साहित्य संमेलनाची नांदी; राज्यभर 99 ठिकाणी ‘साहित्य जागर’
2

100 व्या साहित्य संमेलनाची नांदी; राज्यभर 99 ठिकाणी ‘साहित्य जागर’

प्रशासकीय कारभाराचा हिशोब द्या, सदस्यांची मागणी; जिल्हा परिषदेच्या सभागृहात संतापाचा स्फोट
3

प्रशासकीय कारभाराचा हिशोब द्या, सदस्यांची मागणी; जिल्हा परिषदेच्या सभागृहात संतापाचा स्फोट

जपानमध्ये आता मराठी माणसाचा डंका! शार्प कंपनीत पुण्याच्या उद्योजकाने खरेदी केले ७५% शेअर्स
4

जपानमध्ये आता मराठी माणसाचा डंका! शार्प कंपनीत पुण्याच्या उद्योजकाने खरेदी केले ७५% शेअर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.