Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक; ‘या’ तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आणि नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची बैठक घेतली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 13, 2026 | 06:42 PM
सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक; 'या' तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार

सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक; 'या' तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार

Follow Us
Follow Us:
  • सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक
  • सर्वांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार
  • जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार
पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आणि नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची बैठक घेतली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जबाबदारी, कामकाजाची दिशा आणि समन्वय याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

 

पुणे जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष कसा असावा, कामकाजाची पद्धत कशी असावी आणि विकासकामांना कोणती प्राधान्ये द्यावीत, याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक परिवार आहे. संघटनेतील एकोपा आणि शिस्त हीच आपली ताकद आहे अशी चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र राहण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर मतभेद बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर एकत्र काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. अजित दादांची काम करण्याची शिस्त, वेग आणि नियोजन हीच आपली कार्यपद्धती असली पाहिजे,” अशा सूचना त्यांनी दिल्याचे बेनके यांनी सांगितले. जिल्ह्यातील विकासकामे गतीमान करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

हे सुद्धा वाचा : गावातील उमेदवारांना नाकारून राष्ट्रवादीला दिले विक्रमी मताधिक्य; कोऱ्हाळेकरांची आवडत्या नेत्याला अनोखी श्रद्धांजली

अजित पवार यांचे स्वप्न होणार साकार

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे बारामती तालुक्यातील कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा क्रीडा संकुल (टप्पा-३) अंतर्गत अतिरिक्त इमारत बांधकामे व विविध आधुनिक क्रीडा सुविधा उभारणीसाठी ७५.१३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय मार्गी लावून घेत दिवंगत अजित पवारांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्राप्त झालेल्या बारामती तालुक्यातील कटफळ येथील ८० हजार चौ.मी. क्षेत्रावर हे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारले जाणार असून, यामुळे पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंक, आर्चरी रेंज, बास्केटबॉल मैदान यासह विविध क्रीडा सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

Web Title: A meeting of ncp office bearers in pune was held in the presence of deputy chief minister sunetra pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • pune news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
3

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
4

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.