देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; बोलेरो कोसळली कालव्यात, एकाच कुटुंबातील ९ जणांसह ११ जणांचा मृत्यू
पिंपरी : पुणे जिल्ह्यातून एक अपघाताची घटना समोर आली आहे. औषधी आणण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर काळाने घाला घातला आहे. भरधाव मिक्सरखाली आल्याने ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी (दि.१) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील पिके चौकात हा अपघात झाला आहे. पंडितराव माधवराव समर्थ (वय ६६, रा.बिजलीनगर,चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ हे शुक्रवारी दुपारी औषधे आणण्यासाठी घरातून निघाले. दुचाकीवरून पिंपळे सौदागर येथील निसर्ग क्लिनिक मध्ये जात असताना पिके चौकाजवळ आले असता भरधाव मिक्सरने त्यांना चिरडले. मिक्सरखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घटनेनंतर मिक्सर चालक पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळतच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
बारामतीत भीषण अपघात
हायवा ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पित्यासह दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बारामती शहरात रविवारी (दि २६) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारस घडली आहे. ओंकार राजेंद्र आचार्य (वय ३२, रा. सणसर, ता. इंदापूर) , सई ओंकार आचार्य (वय १०), मधुरा ओंकार आचार्य (वय ४) असे या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. बारामती शहरातील खंडोबानगर चौकात हा अपघात झाला आहे. ओंकार आचार्य हे स्प्लेंडर या दुचाकीवरून दोन्ही मुलींना घेऊन निघाले होते. त्यावेळी हायवा ट्रॅकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी मागच्या चाकाखाली आल्याने ओंकार आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या दोन मुलींना स्थानिक नागरिकांनी दवाखान्यात नेत असतानाच त्या दोन मुलींचा रस्त्यातच मृत्यू झाला. दरम्यान या अपघाताचे दृश्य पाहिल्यानंतर, अनेकांचे डोळे पाणावले. अधिक तपास बारामती पोलीस करत आहेत.
रिक्षाची ज्येष्ठाला जोरदार धडक
पुण्यातील बाणेर भागात रिक्षा चालकाने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी घेऊन जातो, अशी बतावणी करून रिक्षाचालकाने रिक्षात बसवले. त्यानंतर खडकीतील रेंजहिल्स परिसरात रेल्वे रूळाजवळ त्यांना जखमी अवस्थेत सोडून रिक्षाचालक पसार झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रिक्षाचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.