
कोंढव्यात विनापरवानगी खुलेआम झाडांची कत्तल
कोंढवा बुद्रुक: पर्यावरण संवर्धनासाठी एकीकडे राज्य सरकार लाखो- करोडो रूपये खर्च करून वृक्षलागवड करत आहेत.पण दुसरीकडे खुलेआम वृक्षांची कत्तल सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. कोंढवा बुद्रुक येथील सर्व्हे क्रमांक 63 मध्ये प्रशासनाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे महापालिका प्रशासनानेही जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप परिसरातील पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
पुणे शहरातील वृक्ष तोडण्यासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडून परवानगी घेणे आवश्यक असते. पण या प्रकरणात वृक्षप्राधिकरण समितीची परवानगी न घेताच कोंढवा बुद्रुक य़ेथील मोठी झाडे तोडण्यात आल्याची तक्रार स्थानिकांकडून कऱण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे संबंधित बिल्डरच्या फायद्यासाठी ही झाडे तोडण्यात आल्याचेही काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा प्रकारे परवानगी शिवाय झाडे तोडल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत नाहीका, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Jagdeep Dhankhar: राज्यसभा सभापतींविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस, 70 खासदारांचा पाठिंबा
कोंढवा बुद्रुक येथील सर्व्हे क्रमांक 63 येथील राजगृही रेसिडेन्सिलगत असलेल्या जागेवर मोठमोठी झाडे होती. पण बिल्डरच्या फायद्यासाठी ही झाडे तोडण्यात आल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली आहे. तसेच, ही झाडे तोडण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेतली होती का, असाही प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच अंधाराचा फायदा घेऊन आणि कायद्याचा धाक नसल्यानेच शहरात अशा मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोपही होत आहे.
राज्यातच नव्हे तर देशभरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत चालले आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना राबवल्या जात आहेत. वृक्षलागवडीसाठी करोडो रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. तरीही कायद्याचा धाक नसलेले लोक सर्रासपणे विनापरवाना वृक्षतोड करत आहेत. फांद्या छाटण्याच्या नावाखाली लहान-लहान झाडांपासून मोठमोठे वृक्षही मुळापासून तोडले जात आहेत.
वाळुचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले; आता ड्रोनची असणार नजर
यासंदर्भात कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे हॉर्टीकल्चर मिस्त्री यांच्यांशी संपर्क साधण्यात आला. याबाबत बोलताना विजय नेवासे म्हणाले की, काल दुपारी आम्हाला या वृक्षतोडीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर आमचे काही लोकांनी तिथे जाऊन पंचनामा केला आहे. तसेच संबंधितांना नोटीस पाठवण्यात आली असून त्यांच्यावर विनापरवाना वृक्षतोडीची केस दाखल करण्यात येणार आहे.