
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
गुजर निंबाळकरवाडी येथे रस्त्याकाठी संशयास्पद पोते आढळून आले. याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून तपास सुरु केला. मयत तरुणाचे नाव अजय पंडित असल्याचे समोर आले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अशोक पंडितने याला अटक केली आहे. त्याने कबूल केले की त्याने भावाची हत्या करत मृतदेह पोत्यात भरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या गुजरवाडी येथे फेकून दिला होता.
आपसी वादातून हत्या
मृतक आणि आरोपी तरुण हे दोघेही चुलत भाऊ असून ते झारखंड येथील राहणारे आहेत. तरुणाने त्यांच्या आपसी वादातून हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपी अशोक पंडित याला पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पुण्यात मध्यरात्री कोयत्यांचा थरार; एरंडवणेतील रेस्टोबारवर टोळक्याचा हल्ला
पुणे शहरातून अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहे. हत्या, चोरी, दहशत माजवणे, मारहाण, अत्याचार अश्या अनेक घटना आपल्याला दैनंदिन जीवनात ऐकायला मिळतात. या गुन्हेगारी कृत्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता घरातून पडायचं की नाही असा प्रश्न पडला आहे. आता पुन्हा एकदा दहशत माजवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एरंडवणे परिसरात रात्री दीडच्या सुमारास अनंत रेस्टोबारवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला. या टोळक्याच्या हातात कोयते आणि दांडके होते. सशस्त्र असलेल्या या गुंडांनी परिसरात दहशत माजवत रेस्टोबारमध्ये हैदोस घातला. यावेळी त्यांनी बारमध्ये असलेल्या लोकांना धमकावलं. त्यांना शस्त्र दाखवली. ऐवढेच नाही तर फोडतोड ही केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने तिथे उपस्थित असलेले ग्राहक हादरून गेले.
Ans: कात्रज
Ans: अशोक
Ans: चुलतभाऊ