
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं काय घडलं?
पती- पत्नीमध्ये वाद झाला होता. पती मारहाण करेल या भीतीने महिला रात्रीच्या वेळी घराशेजारील वारली हाट कला दालन प्रकल्पात लपून बसली. दिल्ली हाटच्या धर्तीवर वारली हाट कला दालनाची संकल्पाना आहे. गेल्याने कित्येक वर्षांपासून हे दालन रखडलं आहे. येथील वॉचमनने महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तो तेथील वॉचमनच नसून तो पीडित महिलेचा चुलत सासरा देखील आहे. पीडित महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत असतांना आरोपीने तिचे तोंड दाबून ठेवले. अत्याचारास हा प्रकार कुणाला सांगितलस तर जीवे ठार मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचे देखील समोर आले आहे.
या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास मनोर पोलीस करता असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
ग्रामपंचायतच्या ना-हरकत दाखल्यासाठी 20 हजारांची मागणी, ग्रामविकास अधिकाऱ्याला ACB कडून रंगेहात अटक
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पालघर तालुक्यातील नवापूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजेश पंढरीनाथ संखे यांना रंगेहात अटक केली आहे. २० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली. राजेश पंढरीनाथ संखे यांनी कृषी पर्यटन केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक ना-हरकत दाखला देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केल्याची तक्रार होती. मंगळवारी सायंकाळी सापळा रचून कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: पालघरच्या मनोरजवळील वारली हाट कला दालन प्रकल्पात.
Ans: पीडित महिलेचा चुलत सासरा आणि तेथील वॉचमन.
Ans: गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली, तपास सुरू आहे.