crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
पालघर: पालघर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ ५० हजारांसाठी एका आजीने आपल्या १४ वर्षीय नातीची विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही विक्री तीन वर्षांपूर्वीच करण्यात आली होती. तिचे जबरदस्तीने लग्न देखील लावण्यात आले. या अल्पवयीन मुलीला नंतर एक मुलगी झाली. नंतर तिचा छळ करायला सुरुवात केली. वाढत्या त्रासामुळे तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या अडचणी वाढल्या; घरात पोलिसांना काय-काय सापडलं?
ही घटना पालघरच्या वाडा तालुका मधील कातकरी जमातीच्या मुली सोबत घडली. या पीडित मुलीची विक्री अहिल्यानगर येथील गाडे कुटुंबाला विक्री करण्यात आली होती. आणि तिचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आले होते. या प्रकरणी मुलीने वाडा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीला विकून तिचा छळ करण्यात आला. मुलीची सासरच्यांकडून छळ वाढल्यामुळे तिने वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.वाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी मानवी तस्करी कलम 370 , कलम 420 नुसार फसवणूक, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी या अल्पवयीन मुलीचा नवरा जीवन गाडे आणि त्या मुलीला खरेदी करण्यामध्ये भूमिका वठवणारा दलाल रवी कोरे यांना वाडा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात सामील असलेल्या उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे.
छळाचे कारण
या अल्पवयीन मुलीला नंतर एक मुलगी झाल्यानंतर आरोपी आणि त्याच्या घरच्यांकडून तिचा छळ सुरू झाला. सासरच्यांकडून वाढलेल्या त्रासामुळे तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे आणि उर्वरित आरोपींना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पालघर हादरलं! साखरपुड्यानंतर अल्पवयीन मुलीला शरीर संबंधाची मागणी
पालघरमधून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. साखरपुडा झाल्यानंतर अल्पवयीन मुलीला शरीर संबंधाची मागणी करण्यात आली. परंतु तिने नकार दिल्याने तिच्यावर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जव्हार पोलिसांनी सूत्र हलवत कोणतेही पुरावे नसतांना आरोपीला जेरबंद केले आहे.