
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं घडलं?
तर घडलं असं, शुक्रवारी शिक्षकांनी काही विद्यार्थ्यांना शाळेपासून एक किलोमीटर दूर असलेल्या झऱ्यावर पाणी भरायला पाठवले. अंतर जास्त असल्यांने मुलांना परत यायला उशीर झाला. या कारणावरून शिक्षक जाधव यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मारहाणीचं हे दृश्य पाहताच उर्वरित विद्यार्थी घाबरून जंगलात पळाले आणि तिथेच लपून बसले. ही गंभीर बाब पंचायत समितीच्या प्रशासनाला कळवूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप पालक करत आहेत.
शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून एकूण पटसंख्या 26 आहे. नियमित शालेय वेळ सकाळी 10:30 असतानाही शिक्षक जाधव हे नेहमी 11:30 वाजता शाळेत हजेरी लावतात, असे पालकांचे म्हणणे आहे. मुलांना अंगणात उभे करणे, शिकवण्याकडे दुर्लक्ष करून मोबाईलमध्ये रमणे, वारंवार उशिरा येणे आणि शनिवारी गैरहजर राहणे यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शाळेतील शैक्षणिक वातावरणावरही प्रश्नचिन्ह उभे राहत असून, शिक्षक जाधव यांच्या अनियमित कामकाजाबाबत देखील तक्रारी वाढल्या आहेत.
उपसरपंच आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले…
ढाढरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष भोरे म्हणाले, “शिक्षक लोकनाथ जाधव यांच्यावर तात्काळ कारवाई झाली नाही, तर आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करू.” स्थानिक पातळीवरही या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, पालक व ग्रामस्थांनी एकत्र येत कारवाईची मागणी केली आहे.
Ans: उशीर
Ans: जंगल
Ans: पालक