या टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवत बारमधील काही रक्कम लंपास केली. घटना घटनास्थळावरून किती रक्कम पळवली गेली किंवा इतर काही ऐवज चोरीला गेला आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती पोलीसांनी दिलेली नाही.डेक्कन पोलीस स्टेशनचे अधिकारी सकाळपासून घटनास्थळाची पाहणी करून संपूर्ण माहिती गोळा करत आहेत. या घटनेचं सीसीटीव्ही समोर आले आहे.
सीसीटीव्हीत काय?
एक व्यक्ती पहिल्यांदा बारमध्ये शिरतांना दिसत आहे. त्या मागोमाग त्याचे सहकारी बारमध्ये घुसले. या सर्वांनी कोयते आपल्या सोबत ठेवले होते. आत गेल्यानंतर त्यांनी कोयता बाहेर काढला. त्यानंतर उपस्थित असलेली ग्राहक घाबरले. काय करावे हे त्यांना समजले नाहीत. ते गुंड त्यांना धमकावत होते. तोडफोड करत होते. सर्वच जण या अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरले होते. त्याचा फायदा घेवून या गुंडांनी तिथे असलेली रोख रक्कम लांबवली आहे.
या घटनेमुळे व्यवसाय करायचा की नाही असा प्रश्नही निर्माण झाला आहे. शिवाय बार किंवा हॉटेलमध्ये जायचे की नाही असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. पण पोलीसांच्या नाकावर टिच्चून अशा घटना पुण्या सारख्या शहरात होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातही भीतीचे वातावरण आहे.
Ans: एरंडवणे
Ans: कोयते
Ans: सीसीटीव्ही






