
crime (फोटो सौजन्य: social media)
Bomb Threat News: इंडिगो, लुफ्थांसा आणि ब्रिटिश एअरवेजच्या विमानांना बॉम्ब स्फोटाची धमकी
नेमकं काय घडलं?
पीडित महिलेने कासा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीच्या अर्जाच्या चौकशीसाठी महिला पोलीस ठाण्यात गेली होती. यावेळी कासा पोलीस ठाण्यातील हवालदार शरद बोगाडे याने महिलेवर लैंगिक अत्याचार केले. असा आरोप पीडित महिला करत आहे. याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस हवालदार बोगाडे याने लैंगिक अत्याचारासह विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासासाठी गुन्हा कासा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
तडकाफडकी बदली
जिल्हा पोलीस अधिक्षक यतीश देशमुख यांनी या प्रकरणी तातडीने दखल घेत कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांची बदली जिल्हा मुख्यालयात करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्याकडे कासा पोलीस ठाण्याचा पदभर सोपवण्यात आला आहे. आरोपी हवालदार बुगडे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून पोलीस चौकशी करत आहे.
पुण्यातील पोलीस दलात खळबळ! पोलीस नाईक निखिल रणदिवे बेपत्ता
पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस नाईक निखिल रणदिवे हे गेल्या ५ डिसेंबर पासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. निखिल रणदिवे यांना त्यांच्या वरिष्ठांकडून त्रास दिला जात होता. याच त्रासाला कंटाळून निखिल रणदिवे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. निखिल रणदिवे यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितल्यानंतर पोलीस दलाकडून त्यांना शोधण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. पोलिसांनी पाच पथके तयार केली आहे. निखिल रणदिवे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यात त्यांनी गंभीर आरोप केले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या लेकीच्या वाढदिवसाला भावनिक स्टेटस देखील ठेवले होते.
Chhattisgarh Crime: दिवाणजीचे अपहरण, मदतीला गेलेल्या कंत्राटदाराची नक्षलवाद्यांकडून गळा चिरून हत्या
Ans: पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्यात ही घटना घडली.
Ans: हवालदार शरद बोगाडे आरोपी; ताब्यात घेतला गेला, संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू.
Ans: कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे तडकाफडकी बदली, नवीन पदभर अमर पाटील यांच्याकडे सोपवला.