Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur Crime: शेवाळामुळे मुलगा तळ्यात पडला, वाचवायला गेले दाम्पत्यही बुडाले; पंढरपूर तालुक्यात दुर्दैवी घटना

पंढरपूर तालुक्यातील कोर्टीत शेतात राहून मजुरी करणाऱ्या दाम्पत्यासह त्यांच्या ५ वर्षीय मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. मुलगा पाण्यात पडल्यावर आई-वडिलांनी वाचवण्यासाठी उडी घेतली, मात्र तिघांचाही मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 10, 2025 | 02:42 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मुलगा तळ्याकडे जाताना घसरून पाण्यात पडला
  • आईने वाचवण्यासाठी उडी घेतली, त्यानंतर वडिलांनीही उडी
  • तिघंही पाण्याच्या खोलीत अडकल्याने मृत्यू
पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढपूर जिल्ह्यातील कोर्टी परिसरात सोमवारी दुपारी हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. शेततळ्यात पाच वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याने आई-वडिलांनी देखील शेततळ्यात उडी मारली. यामुळे या दाम्पत्याचा देखील मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. विजय राजकुमार लोंढे (30), पत्नी प्रियांका (28) आणि त्यांचा लहान मुलगा प्रज्वल (5) अशी मृतांची नावे आहेत. मृत दाम्पत्याला एक मोठा मुलगा देखील आहे. ही घटना जेव्हा घडली तेव्हा तो शाळेत होता.

कसा झाला मृत्यू?

पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे सुरेश लाड आणि निखिल लाड यांच्या मालकीच्या शेतात लोंढे दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून सालगडी म्हणून राहत होते. रोजच्या प्रमाणे ते सोमवारीही दोघे शेतातील कामात गुंतले होते. तेव्हाच त्यांचा पाच वर्षांचा लहान मुलगा प्रज्वल हा शेततळ्याच्या दिशेने गेला. शेततळ्याच्या कडेला शेवाळ साचली होती. त्यामुळे तो घसरून पाण्यात पडला. हे आई- वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी देखील ततातडीने पाण्यात उडी मारली. मात्र तळ्यातील घसरडी पृष्ठभाग, कडेला असलेली साचलेली गळ आणि खोल पाणी यामुळे ती स्वतःच अडचणीत सापडू लागली.

पत्नी आणि मुलगी दोघेही पाण्यात झुंजत असल्याचे पाहताच विजय लोंढे यांनीही तळ्यात उडी घेतली. परंतु परिस्थिती अनुकूल नसल्याने आणि तिघेही एकमेकांना धरून असल्याने ते पाण्यावर तरंगू शकले नाहीत. काही क्षणांत तिघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली असल्याचे सांगितले जाते. त्या वेळी शेत परिसर ओसाड असल्याने कोणीही तातडीने मदतीला धावून येऊ शकले नाही.

गावात शोककळा

पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पंढरपूर तालुका पोलीस घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह बाहेर काढले. प्राथमिक तपासानुसार ही दुर्घटना अपघाती असल्याची पोलिसांनी समजले आहे. लोंढे कुटुंब हे मूळचे मंगळवेढा तालुक्यातील असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते पंढरपूर तालुक्यातील या शेतात राहून काम करत होते. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे कुटुंबाला योग्य मदत देण्याची मागणी केली आहे.

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: दुर्घटना कशी घडली?

    Ans: खेळताना मुलगा तळ्यात पडला. आई त्याला वाचवण्यासाठी उतरली, नंतर वडिलांनी उडी घेतली. तिघेही पाण्यात अडकून मृत्यूमुखी पडले.

  • Que: या घटनेत कोण वाचला?

    Ans: मोठा मुलगा शाळेत असल्याने घटनेवेळी उपस्थित नव्हता आणि तो वाचला.

  • Que: प्राथमिक निष्कर्ष काय?

    Ans: पोलिस तपासानुसार घटना अपघाती स्वरूपाची असल्याचे मानले जात आहे.

Web Title: Pandharpur crime unfortunate incident in pandharpur taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime: तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटाला, नंतर मृतदेह पुलाखाली फेकला, आई वडिलंनीच केली हत्या; कारण काय?
1

Ahilyanagar Crime: तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटाला, नंतर मृतदेह पुलाखाली फेकला, आई वडिलंनीच केली हत्या; कारण काय?

Sindhudurg crime: कणकवलीत धक्कादायक प्रकार! युवक-युवतीने धरणात उडी घेऊन उचलले टोकाचे पाऊल
2

Sindhudurg crime: कणकवलीत धक्कादायक प्रकार! युवक-युवतीने धरणात उडी घेऊन उचलले टोकाचे पाऊल

Solapur News: मध्यरात्री स्मशानभूमीत आघोरी कृत्य; जळत्या चितेच्या शेजारी काळ्या बाहुल्या, लिंबू-सुया, फोटो आणि…
3

Solapur News: मध्यरात्री स्मशानभूमीत आघोरी कृत्य; जळत्या चितेच्या शेजारी काळ्या बाहुल्या, लिंबू-सुया, फोटो आणि…

Thane Crime: घरकाम करणारी महिला चार दिवस गैरहजर; संतापलेल्या मालकिणीच्या मुलाने रोखली बंदूक, ठाण्यातली घटना
4

Thane Crime: घरकाम करणारी महिला चार दिवस गैरहजर; संतापलेल्या मालकिणीच्या मुलाने रोखली बंदूक, ठाण्यातली घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.