
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं प्रकरण काय?
घोडबंदर रोड येथील वाघबिळमधील जानगिड गॅलॅक्सी टॉवरमध्ये राहणाऱ्या घर मालकीण मोनिलका शर्मा यांच्या घरी एक महिला गेल्या ६ महिन्यांपासून घर काम करत होती. या घरकाम करणाऱ्या महिलेने ६ डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एका दिवसांची सुट्टी घेतली. चार दिवस उलटूनही ती महिला कामावर गेली नाही. वारंवार घरमालकीण तिला फोन करत होती. ती फोन देखील उचलत नव्हती.
घरमालकिणीने मंगळवारी पुन्हा घरकाम करणाऱ्या महिलेला फोन केला. त्यावेळी घरकाम करणाऱ्या महिलेने फोन उचलताच संतापलेल्या मोनिका शर्मा आणि त्यांच्या मुलाने तिला शिवीगाळ करत तिच्यावर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार पीडित महिलेने तिच्या नातेवाईकांना सांगितला. यावेळी पीडित महिलेचे नातेवाईक घडलेल्या प्रकारचा जाब विचारण्यासाठी घर मालकिणीच्या घराखाली गेले.
कुटुंबियांवर बंदूक रोखली
दरम्यान, घरमालकीण आणि तिच्या मुलासोबत त्यांचा मोठा वाद झाला. मुलाने थेट पीडित महिला आणि तिच्या नातेवाईकांना धाक दाखवण्यासाठी बंदूक रोखली. या प्रकाराने पीडितेच्या कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी याबाबतची माहिती कासारवडवली पोलिसांना दिली. पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चौकशी सुरु केली.
बंदूक निघाली खोटी
पोलिसांच्या चौकशीत बंदूक ही खरी नसून बंदुकीसारखा हुबेहूब दिसणारा लाईटर असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी घर मालकीण मोनिका शर्मा आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे. पीडित महिलेने सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आणि एवढेच नाही तर धमक्या दिलेल्या
कॉल रेकॉर्डिंग देखील पोलिसांकडे सादर केलं.
मनसे कार्यकर्ता पोलीस ठाण्यात
या प्रकरणाची माहिती मिळताच मनसेचे कार्यकर्ता पोलीस ठाण्यात दाखल झाले. पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी देखील केली. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.
Ans: घरकामगाराने एका दिवसाची सुट्टी घेतल्यानंतर 4 दिवस कामावर न आल्याने घरमालकिणी संतापली आणि वाद निर्माण झाला.
Ans: कॉलवर शिवीगाळ आणि चोरीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली. तसेच मुलाने बंदूकीसारखा दिसणारा लाईटर रोखला.
Ans: पोलीस घटनास्थळी पोहोचले, चौकशी केली आणि घरमालकिणी व मुलाला ताब्यात घेतले. प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.