पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका परप्रांतीय कामगार युवकाने आत्म्हताय केल्याची बातमी समोर आली आहे. आत्म्ह्तायेपूर्वी या युवकाने एक व्हिडीओ देखल बनवला होता.हा व्हिडीओ वायरल झालं असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. मृतकाचे नाव संजयकुमार विनोदकुमार राजपूत (वय 18) असे आहे. तो पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी येथील देहूरोडमध्ये कन्स्ट्रक्शन इमारतीवर कामाला होता.
डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग, तर लॉजच्या नावाखाली कुंटणखाना…; मोहोळमध्ये चाललयं काय?
काय घडलं नेमकं?
संजयकुमार १७ तारखेपासून बेपत्ता होता. त्यामुळे देहूरोड पोलीस स्टेशनला त्यासंदर्भात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या पथकाने तांत्रिक तंत्रज्ञानच्या आधारे या बेपत्ता तरुणाचा शोध लावला. मात्र, पोलिसांच्या हाती त्याचा मृतदेह लागला, या मृतदेहा शेजारी एक विषाची बाटली पोलिसांना सापडली आहे. त्यामुळे, या युवकाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झालं आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली.
व्हिडिओत काय?
संजयकुमारने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवला होता. या व्हिडिओत त्याने म्हंटले आहे की, माझ्या आई वडिलांबद्दल मला आदर आहे, तर माझ्या दोन लहान बहिणींची मला खूप काळजी वाटते. माझ्यानंतर त्यांचा सांभाळ नीट करावा, त्यांनी शिकून मोठं व्हावे हीच माझी इच्छा आहे.असे व्हिडिओत युवक म्हणत आहे. आत्महत्यापुर्वी या तरुणाची आपल्या परिवाराबद्दलची तळमळ आणि प्रेम पाहून व्हिडिओ पाहणाऱ्यांनाही गहिवरुन येतं.
Walmik Karad : वाल्मिक कराडची अचानक प्रकृती बिघडली; रक्तदाबाचा त्रास होऊनही ॲडमिट का केलं नाही?