Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

परळीत भाजप नेत्याचे पुतणे कृष्णा मुंडे यांच्यावर १५ ते १६ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून सात जणांवर गुन्हा दाखल आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 30, 2026 | 11:03 AM
Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

Follow Us
Follow Us:
  • परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर १५ ते १६ जणांचा हल्ला
  • जुन्या वादातून धारदार शस्त्रांनी प्राणघातक मारहाण
  • सीसीटीव्हीत हल्ल्याचा थरार कैद; सात जणांवर गुन्हा
 

परळी : जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त होत असतानाच परळीत भरवस्तीत झालेल्या प्राणघातक हल्ल्याने खळबळ उडाली आहे. परळी नगरपरिषदेतील भाजपचे गटनेते तथा सभापती पवन मुंडे यांचे पुतणे कृष्णा मुंडे यांच्यावर १५ ते १६ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती असून, या हल्ल्यात कृष्णा मुंडे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा: Pune News: पुणे मेट्रोच्या विस्ताराला राज्याची मोठी चालना; तीन मार्गांसाठी १८० कोटींचा निधी मंजूर

जीव वाचवण्यासाठी पळाले; हल्लेखोरांनी पाठलाग करून केला हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादाची कुरापत काढून हल्लेखोरांनी कृष्णा मुंडे यांना एकटे गाठले. परिस्थिती लक्षात येताच कृष्णा मुंडे यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. ‘सोडू नका याला, मारा!’ असा आरडाओरडा करत टोळक्याने त्यांना गाठले आणि दगड, लाथाबुक्क्या तसेच धारदार शस्त्रांनी मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यात कृष्णा मुंडे जखमी झाले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्ल्याचा संपूर्ण प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Crime News: सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद; काडतूस सापडताच हत्येचा उलगडा, सीसीटीव्हीत दोन हल्लेखोर कैद

सात जणांविरोधात गुन्हा; आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ

घटनेनंतर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी हनुमंत फड, सतीश हनुमंत फड, संदीप सोनवणे, विशाल सारणीकर, महेश कांता शिंदे, बालाजी दहिफळे आणि भागवत साबळे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थिती तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचीही माहिती घेतली जात आहे. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. भररस्त्यात एवढ्या मोठ्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यामुळे परळी शहरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Parli krishna munde attack bjp leader nephew cctv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • Beed crime News
  • BJP
  • BJp leader
  • Sharp Weapons

संबंधित बातम्या

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
1

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
2

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज
3

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम
4

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.