लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर सातत्याने अत्याचार; पीडितेला मुलगी होताच...
अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून एका विवाहित महिलेवरच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अमरावती येथे घडली असून, पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात येवदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : चाकूचा धाक दाखवला अन् मोबाईल पळवून नेला; रस्त्याने जाताना तरूणाला अडवलं
मनोज जियालाल मलिये (वय 32) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 32 वर्षीय विवाहितेचे मनोज याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या काळात मनोजने ‘तुझ्या पतीला घाबरू नको, मी तुझ्यासोबत आहे’, असा विश्वास पीडितेला दिला. इतकेच नाहीतर ‘पतीला घटस्फोट दे’, असा आग्रहही त्याने तिच्याकडे केला. घटस्फोटानंतर तुझ्यासह तुझ्या मुलांनासुद्धा सांभाळतो, लग्नदेखील करतो, अशी बतावणी त्याने केली.
त्यानंतर त्याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर तो लग्नासाठी पीडितेला टाळू लागला. नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने येवदा ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपी मनोजविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर लैंगिंक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हेदेखील वाचा : चुलत भावानेच केला भरदिवसा भावाचा खून; इगतपुरीत एकच खळबळ