सौजन्य : iStock
वाशीम : मित्राला घेण्यासाठी दुचाकीने जात असलेल्या तरुणाला तीन ते चार जणांनी अडवले. त्याला चाकूचा धाक दाखवत त्याचा मोबाईल फोनही लुटून नेला. ही घटना जऊळका येथील रेल्वे स्टेशनजवळ घडली. याबद्दल जाब विचारणाऱ्या तरुणावरही चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण सुदैवाने बचावला.
हेदेखील वाचा : तब्बल 100 सीसीटीव्ही तपासून लावला ‘त्या’ ट्रकचालकाचा शोध, असा अडकला जाळ्यात
जऊळका पोलिस स्टेशनच्या हद्दीत किन्हिराजा येथील दोन तरुण नागपूर येथे अग्निवीरच्या भरतीसाठी गेले होते. रविवारी ते नागपूरवरून रेल्वेने जऊळका येथे येत होते. मात्र, जऊळका येथून घरी जाण्यासाठी कुठलेच वाहन उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी आपल्या मित्राला दुचाकी घेऊन जऊळका स्टेशन येथे बोलाविले. किन्हीराजा येथील सदर तरुण आपल्या मित्राला घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जात असताना जऊळका येथील तीन ते चार जणांनी त्याला रेल्वे स्टेशन येथे अडविले व त्याचा मोबाईल मागितला.
हेदेखील वाचा : प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाची हत्या; दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने पहिल्या प्रियकराला संपवलं
या तरुणाला वाटले त्यांना कोणाला कॉल करायचा असेल. त्यामुळे त्याने मोबाईल दिला. त्यानंतर त्यांनी त्याचा पासवर्ड विचारला असता त्यांना पासवर्ड सुध्दा सांगितला. मात्र, पासवर्ड मिळताच ते तीन ते चार जण मोबाईल परत न करताच तेथून निघाले. त्यामुळे या तरुणाने ‘माझा मोबाईल कुठे घेऊन जाता?’ असा प्रश्न करत त्याने आपला मोबाईल त्यांना परत मागितला. मात्र, मोबाईल परत मागताच त्यांनी त्याला ‘तू इथून निघून जा’, असे म्हणत आपल्या जवळील चाकू दाखवला आणि तेथून पळून गेले.