Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पतीच्या चारित्र्यावर संशय अन् सहा महिन्यांचा वाद; पहाटे तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हातोडीने…

सहा महिन्यांपासून धुमसणारा कौटुंबिक वाद पहाटेच्या सुमारास अचानक हिंसक वळणावर गेला. घरात झोपलेल्या तरुणाला तिघांनी गाठले आणि हातोडीने हल्ला केल्याने पिंपरीत खळबळ उडाली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 17, 2026 | 02:56 PM
Pune Crime: पतीच्या चारित्र्यावर संशय अन् सहा महिन्यांचा वाद; पहाटे तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हातोडीने...

Pune Crime: पतीच्या चारित्र्यावर संशय अन् सहा महिन्यांचा वाद; पहाटे तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हातोडीने...

Follow Us
Follow Us:
  • सहा महिन्यांचा वाद, पहाटे हल्ला
  • झोपलेल्या तरुणावर हातोडीने वार
  • दोन महिलांसह तिघे अटकेत
 

पिंपरी-चिंचवड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्याच्या कारणातून गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाचा पहाटेच्या सुमारास हिंसक शेवट झाल्याची घटना पिंपरीतील बौद्धनगर झोपडपट्टी परिसरात घडली. मंगळवारी (१५ सप्टेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास तिघांनी तरुणावर हल्ला केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर लोखंडी हातोडीने त्याच्या डोक्यासह शरीरावर वार करण्यात आल्याने तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका तरुणासह दोन महिलांना अटक केली आहे. आकाश अनिल खंडागळे (वय ३२, रा. बौद्धनगर, पिंपरी) याच्यासह ५० आणि २८ वर्षीय दोन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

हेही वाचा:Pune Crime: आंतरधर्मीय विवाहाला विरोध;चेन्नईहून पुण्यात आलेल्या बापाने मुलगी-जावयाचे अपहरण केल्याचा आरोप

सहा महिन्यांपासून धुमसत होता वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाच्या पत्नीला त्याच्या चारित्र्यावर संशय होता. या कारणावरून पती-पत्नीमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार वाद होत होते. या वादाचा राग मनात धरून आरोपींनी तरुणावर हल्ला केल्याचा आरोप आहे. मंगळवारी पहाटे तरुण झोपेत असताना आरोपींनी त्याला गाठले. त्याच्याशी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर लोखंडी हातोडीने तरुणाच्या डोक्यावर, तोंडावर, छातीवर आणि बरगड्यांवर वार केल्याचा आरोप आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.

हेही वाचा: Crime News: मोशीत पती-पत्नीच्या वादात सासूची मध्यस्थी अंगलट; जावयाने कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप, गुन्हा दाखल

बहिणीची पोलिसांत फिर्याद

हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जखमी तरुणाच्या ३० वर्षीय बहिणीने पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आकाश खंडागळे याच्यासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासाची सूत्रे हाती घेत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हल्ल्यामागील नेमकी कारणे, आरोपींची भूमिका आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Web Title: Pimpri crime young man hammer attack family dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • pimpari crime
  • Pimpri Chinchwad crime
  • Pimpri News
  • Pimpri Police

संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad News:पिंपरी-चिंचवड महापालिकेत बांधकाम अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप; फडणवीसांकडून चौकशीचे आदेश
1

Pimpri Chinchwad News:पिंपरी-चिंचवड महापालिकेत बांधकाम अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप; फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.