पिंपरीत दांडिया पाहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर जुन्या भांडणातून १९ जणांच्या टोळक्याने कोयते व लोखंडी गजाने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेवर कर्णकर्कश आवाजामध्ये गाणे लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण केल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले आहे. यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात एका अज्ञात व्यक्तीने ‘मास्क मॅन’च्या रूपाने खळबळ उडवून दिली आहे. चेहऱ्यावर मास्क, आणि हातात धारदार चाकू घेऊन भरदिवसा रस्त्यावर वावरताना नागरिकांना दिसला आहे.
पिंपरीतील व्यावसायिकावर भरदिवसा गोळीबार करून सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणातील सराईत गुन्हेगार रवींद्र भाऊसाहेब घारे याला मालमत्ता विरोधी पथकाने अखेर गजाआड केले आहे.
हिंजवडी पांडवनगर येथे अतिक्रमणाबाबत चर्चा सुरू असताना हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पी आय) बालाजी पांढरे यांनी शेतकरी बांधवांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप छावा संघटनेने केला आहे.
पिंपरी शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात, बंगल्यात घुसून वृद्ध नागरिकाचे हातपाय बांधून, पिस्तूलाचा धाक दाखवत दरोडा टाकणार्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
महिला पोलिसाच्या सतर्कतेमुळे बांगलादेशी घुसखोर महिलेला जेरबंद करण्यात आले आहे. शहनाज हलीम चौधरी उर्फ शिला मोहमद कुद्दुसमीया अखतर असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिस ठाण्यासमोरच रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे एक पोलिस अंमलदराला चांगलेच महागात पडले आहे. ही बाब पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधित तीन पोलीस अंमलदारांना निलंबित केले.
तीन मित्र अंडाभुर्जी खाण्यासाठी गेले. तिथे एक तरुण सिगारेट ओढत होता. बाजूला जाऊन सिगारेट ओढ, असे त्याला सांगितल्याने त्याने ब्लेडने दोघांवर वार करत खून करण्याचा प्रयत्न केला आहे.