
Accident Breaking
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील वाई येथून महाडच्या दिशेने निघालेली ग्रँड व्हिटारा कार (क्र. MH 11 DZ 4046) पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरून जात होती. ओझर्डे (ता. वाई, जि. सातारा) येथील रहिवासी चालक आदेश रवींद्र गवते (वय ३१) याला अचानक डुलकी आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार विरुद्ध दिशेला जाऊन रस्त्याच्या कडेला पार्क केलेली ईको कार (क्र. MH 06 CL 0802), ‘छोटा हत्ती’ टेम्पो (क्र. MH 06 CP 4094) आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला (क्र. MH 06 CF 2929) जोरदार धडकली.
मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
हा अपघात इतका भीषण होता की ग्रँड व्हिटारा कारच्या दोन्ही एअरबॅग्ज लगेच उघडल्या. या अपघातात दुचाकीस्वार विजय गणपत शिंदे (रा. चोळई, ता. पोलादपूर) यांच्या नाकाला व उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. तर पादचारी महिला फिरोज रफिक शेख (रा. शिवाजीनगर मोहल्ला, ता. पोलादपूर) यांच्या डोक्याला व उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे.
अपघातातील जखमींवर पोलादपूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिकेने महाड येथे हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या अपघाताचा पुढील तपास पोलादपूर पोलीस करत आहेत.
बातमी अपडेट होत आहे…