(फोटो सौजन्य: X)
मोबाईलमुळे झाला अपघात…
मोबाईलचा अतिवापर आपल्या जीवास कसा घातक ठरु शकतो याचे जिवंत उदाहरण तुम्हाला सध्याच्या व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळेल. व्हायरल व्हिडिओत छतावर एक व्यक्ती चालताना दिसतो. त्याचे संपूर्ण लक्ष हे त्याच्या फोनवर असते, ज्यामुळे चालताना तो समोर पाहत नाही आणि याचाच पश्चाताप त्याला पुढे जाऊन होतो. व्यक्ती मोबाईलमध्ये पाहत पुढे चालत जातो खरा पण पुढे एक मोठी मोकळी जागा आहे हे त्याच्या नजरेत येत नाही. परिणामी मोकळ्या जागेत व्यक्तीचा पाय पडतो आणि तो धाडकन खाली कोसळतो. व्यक्तीला काही समजेल आणि तो स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करेल याआधीच तो अपघाताला बळी पडलेला असतो. व्यक्ती इतका जोरात खाली पडतो की आजूबाजूची सर्व लोक ते दृष्य पाहून हादरतात. व्हिडिओच्या शेवटी लोक शिड्यांवरून खाली उतरत व्यक्तीच्या मदतीसाठी धाव घेताना दिसून येतात. वरच्या मजल्यावरुन खाली कोसळल्याने व्यक्तीला दुखापत तर चांगलीच झाली असेल तथापि त्याच्या प्रकृतीची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
A guy fell from the floor above. Please watch where you’re walking and look down too💀😭 pic.twitter.com/k9XZg3s5eC — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 10, 2026
या घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत ७ लाखाहून अधिकचे व्हूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “फ्लोअरची डिजाईन किती बकवास आहे, याच्या मधोमध रिकामी बाजू ठेवण्याची काहीच गरज नव्हती”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण तिथे ती मोकळी जागा कशासाठी आहे?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “फ्लोअरच्या विचित्र डिजाईनमुळे हे घडले, इंटिरियर डिझायनरला किंवा आर्किटेक्टला लगेच अटक करा”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






