पुण्यातील विहिरीत आढळला एकाचा मृतदेह; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड
पुणे : पुण्यातील धानोरी येथील कुकरेज सोसायटीसमोरील विहिरीत ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. २३) समोर आला असून, मृत्यू नेमका कसा झाला आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. दशरथ पाचू बारवते (वय 60, रा. भैरवनगर, आनंद पार्क, धानोरी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धानोरी येथील कुकरेजा सोसायटीसमोरील विहिरीत एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार, विश्रांतवाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले. त्यांनी अग्निशामक दलाच्या जवानांच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी तो मृतदेह दशरथ यांचा असल्याची ओखळ पटली. त्यांच्या मुलाला पोलिसांनी ही माहिती दिली.
दशरथ यांना दारुचे व्यसन होते. तसेच त्यांच्या मनक्याचे ऑपरेशन देखील झाले होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रथमिक अंदाज आहे. दरशथ बेपत्ता झाल्याची तक्रार देखील त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिली होती. अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक कांचन जाधव यांनी दिली.