Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल अन् तीन जिवंत काडतुसे; बारामती पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

बारामती शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका तरुणाकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि मारुती स्विफ्ट कार असा एकूण २ लाख २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 24, 2026 | 06:19 PM
स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल अन् तीन जिवंत काडतुसे; बारामती पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल अन् तीन जिवंत काडतुसे; बारामती पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:
  • बारामतीत तरुणाकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त
  • स्विफ्ट कारसह २.२६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • पिस्तुलाच्या स्रोताचा पोलीस तपास सुरू
बारामती : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका तरुणाकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि मारुती स्विफ्ट कार असा एकूण २ लाख २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आमराई (बारामती) येथील आदित्य शेलार याला अटक करण्यात आली असून, निवडणुकीच्या संवेदनशील काळात झालेल्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

 

२२ ऑक्टोबर रोजी रात्री ८ च्या सुमारास तपास पथकातील पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आदित्य शेलार हा लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून टी. सी. कॉलेज परिसरात बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगून फिरत आहे. या माहितीच्या आधारे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मनीषा ओमासे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने सापळा रचला. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ८ नंबर ग्राउंडजवळील मोरया पॅलेस इमारतीसमोरील रस्त्यावर संशयित कार अडवून पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली.

सर्व मुद्देमाल केला जप्त

तपासणीदरम्यान चालकाच्या सीटजवळ एक गावठी पिस्तूल आणि त्याच्या मॅगझीनमध्ये १ जिवंत काडतूस मिळून आले. तसेच शेलारची अंगझडती घेतली असता त्याच्या जॅकेटच्या खिशात आणखी २ जिवंत काडतुसे सापडली. शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना त्याच्याकडे नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी २५ हजार रुपयांचे पिस्तूल, १ हजार २०० रुपयांची तीन काडतुसे आणि २ लाख रुपयांची कार असा एकूण २ लाख २६ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : नालासोपारा एमडी ड्रग्ज प्रकरणाचे तेलंगणापर्यंत धागेदोरे, अवैध कारखाना उद्ध्वस्त; २५ आरोपींना अटक

शस्त्राचा मूळ स्रोत शोधण्याचे आव्हान

प्राथमिक चौकशीदरम्यान हे पिस्तूल मयूर मोरे (रा. मेडद, ता. बारामती) याच्याकडून आणल्याची कबुली संशयित आरोपीने दिली आहे. हे शस्त्र कोणत्या कारणासाठी आणले होते आणि यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या समन्वयाने करण्यात आली. पथकातील पोलीस हवालदार क्षीरसागर, अभिजीत कांबळे, पोलीस शिपाई कवितके आणि अक्षय सिताफ यांनी यात सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पूर्णेकर हत्याकांडाच्या तपासावर सपकाळांचे प्रश्नचिन्ह; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: बारामती पोलिसांनी आरोपीकडून काय जप्त केले?

    Ans: आदित्य शेलार याच्याकडून गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि मारुती स्विफ्ट कार असा एकूण २ लाख २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

  • Que: पोलिसांनी ही कारवाई कुठे आणि कधी केली?

    Ans: २२ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बारामतीतील ८ नंबर ग्राउंडजवळील मोरया पॅलेस इमारतीसमोरील रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

  • Que: आरोपीने पिस्तूल कुणाकडून आणल्याचे सांगितले?

    Ans: प्राथमिक चौकशीत आदित्य शेलार याने हे पिस्तूल मेडद, ता. बारामती येथील मयूर मोरे याच्याकडून आणल्याचे सांगितले. पिस्तूल कशासाठी आणले होते आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.

Web Title: In baramati the police have arrested a young man for possessing a pistol nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Student Dies By Self Immolation: दिल्लीत शाळेतच विद्यार्थीनीची पेटवून घेऊन आत्महत्या; ३ पानांच्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?
1

Student Dies By Self Immolation: दिल्लीत शाळेतच विद्यार्थीनीची पेटवून घेऊन आत्महत्या; ३ पानांच्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?

नालासोपारा एमडी ड्रग्ज प्रकरणाचे तेलंगणापर्यंत धागेदोरे, अवैध कारखाना उद्ध्वस्त; २५ आरोपींना अटक
2

नालासोपारा एमडी ड्रग्ज प्रकरणाचे तेलंगणापर्यंत धागेदोरे, अवैध कारखाना उद्ध्वस्त; २५ आरोपींना अटक

रावण दहनात बंटीला संपवण्याचा कट, पोलिस बंदोबस्तामुळे प्लॅन बदलला; तपासातून धक्कादायक माहिती समोर
3

रावण दहनात बंटीला संपवण्याचा कट, पोलिस बंदोबस्तामुळे प्लॅन बदलला; तपासातून धक्कादायक माहिती समोर

आधी महिलेवर गोळी झाडली, पोलिस मागावर असतानाच आरोपीने स्वतःला संपवले; अहिल्यानगरमधील घटनेनं खळबळ
4

आधी महिलेवर गोळी झाडली, पोलिस मागावर असतानाच आरोपीने स्वतःला संपवले; अहिल्यानगरमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.