Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

100 अन् 500 च्या बनावट नोटा छापायचे, पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या; सापळा रचला आणि…

घरातच १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इचलकरंजीतील तीन तरुणांना अटक केली आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 14, 2025 | 06:05 PM
100 अन् 500 च्या बनावट नोटा छापायचे, पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या; सापळा रचला आणि…

100 अन् 500 च्या बनावट नोटा छापायचे, पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या; सापळा रचला आणि…

Follow Us
Close
Follow Us:

इचलकरंजी : घरातच १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इचलकरंजीतील तीन तरुणांना अटक केली आहे. अनिकेत विजय शिंदे (वय २४ रा. पंत मंदिर समोर मंगळवार पेठ), राज रमेश सनदी (वय १९ रा. भुईनगर शहापूर) आणि सोएब अमजद कलावंत (वय १९ रा. परीट गल्ली गावभाग) अशी त्यांची नावे आहेत. या कारवाईत त्यांच्याकडून २ लाख २४ हजाराच्या बनावट नोटा आणि ७० हजार ७०० रुपयांचे इतर साहित्य असा २ लाख ९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तिघांनी या बनावट नोटा कधीपासून बनविण्यास सुरुवात केली, त्या कुठे वापरल्या, अन्य साथीदार कोणी आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

बाजारात बनावट नोटा खपविण्याचे प्रमाण वाढल्याने नोटा छपाईतील सक्रिय टोळ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षकांनी दिले होते. त्यानुसार तपास सुरु असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार संतोष बरगे व प्रदीप पाटील यांना इचलकरंजीतील नारायण टॉकीज परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरिक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने बुधवारी रात्री सापळा रचला. त्यावेळी अनिकेत शिंदे याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याची झडती घेता त्याच्या खिशात काही बनावट नोटा मिळून आल्या. अधिक चौकशी करता त्याने घरातच बनावट नोटांची छपाई करत असल्याचे सांगितले. त्यामध्ये राज सनदी व सोएब कलावंत मदत करत असल्याचे व ते घरात असल्याचे सांगितले.
या तिघांवर गावभाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलिस निरिक्षक रवींद्र कळमकर, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, उपनिरिक्षक संतोष गळवे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे.

घरात आढळले नाेटा बनविण्याचे साहित्य

मंगळवार पेठ परिसरातील पंत मंदिरासमोरील शिंदे राहण्यास असलेल्या घरात छापा टाकला. त्यावेळी कलावंत व सनदी मिळून आले. घरातच बनावट नोटा व नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेले साहित्य मिळून आले. पथकाने या तिघांनाही ताब्यात घेतले. या कारवाईत ५०० रुपयांचा ३९२ आणि १०० रुपयांच्या २८२ अशा २ लाख २४ हजार रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. प्रिंटर, नोटांसाठीचा कागद, दोन मोबाईल व इतर साहित्य असा ७० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Police have arrested 3 people from ichalkaranji for printing fake currency notes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • Arrested News
  • Ichalkaranji
  • Kolhapur Police

संबंधित बातम्या

चरस विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले
1

चरस विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

Crime News : खंडणी प्रकरणात मोठी कारवाई; पिंपरीत काँग्रेसच्या नेत्यासह दोघाना अटक
2

Crime News : खंडणी प्रकरणात मोठी कारवाई; पिंपरीत काँग्रेसच्या नेत्यासह दोघाना अटक

तासगाव पाेलिसांची मोठी कारवाई; बेकायदा दारू साठ्यावर छापा टाकला अन्…
3

तासगाव पाेलिसांची मोठी कारवाई; बेकायदा दारू साठ्यावर छापा टाकला अन्…

आयुष कोमकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट! आंदेकर टोळीबाबत न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय
4

आयुष कोमकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट! आंदेकर टोळीबाबत न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.