बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात पोलिसांना मोठं यश; तिसराही आरोपी अटकेत
पुणे : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतात. अशीचं एक घटना गेल्या ६ महिन्यापूर्वी बोपदेव घाटात घडली होती. यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार झाला होता आणि या प्रकरणातील दोन आरोपींना गेल्या काही महिन्यांपूर्वी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या, तर तिसरा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. अशातचं आता तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिसांनी (शनिवार, 26 एप्रिल) तिसऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
तिसऱ्या आरोपीला आता पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. बापू उर्फ दशरथ गोसावी असं या आरोपीचं नाव आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात पुणे पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून दुसऱ्या आरोपीला अटक केली आहे. अख्तर शेख असं 27 वर्षीय आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणावर अत्याचार करणाऱ्यांमध्ये तीन तरुणांचा समावेश होता. आतापर्यंत दोन आरोपींना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलं होतं. पण, तिसरा आरोपी सापडत नव्हता. अखेर त्यालाही जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालंय.
नेमकं काय घडलं होतं?
बोपदेव घाटात 3 ऑक्टोबरला मध्यरात्रीच्या सुमारास तरुणीवर अत्याचाराची घटना घडली. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं. त्यानंतर पुणे शहरात त्याचे पडसाद पाहायला मिळाले. महिला पुणे शहरात सुरक्षित आहेत की नाही यावर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. पुणे पोलिसांकडून जेव्हा तपासणी सुरू करण्यात आली तेव्हा सगळ्यात पहिले एक CCTV फुटेज जरी करण्यात आलं होता. ज्यामध्ये तीन मूलं दिसले होते. पण ते आरोपी नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर दोन आरोपींचे स्केच जारी करण्यात आले. ज्यावर दहा लाखाचं बक्षीस देखील जाहीर केलं होतं. त्यासाठी पुणे पोलिसांना जवळपास 250 हून अधिक कॉल आले होते. पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेने आरोपींना पकडण्यासाठी 60 हून अधिक पथकं तैनात केली होती.