Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात दहावी-बारावी परीक्षेत कॉपीप्रकरणी 81 कर्मचारी निलंबित; बारावीच्या परीक्षेत 233 गैरप्रकार, तर दहावीच्या…

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर कॉपी आणि सामूहिक गैरप्रकारांच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 09, 2026 | 12:28 PM
राज्यात दहावी-बारावी परीक्षेत कॉपीप्रकरणी 81 कर्मचारी निलंबित; बारावीच्या परीक्षेत 233 गैरप्रकार, तर दहावीच्या...

राज्यात दहावी-बारावी परीक्षेत कॉपीप्रकरणी 81 कर्मचारी निलंबित; बारावीच्या परीक्षेत 233 गैरप्रकार, तर दहावीच्या...

Follow Us
Follow Us:

पुणे/सोनाजी गाढवे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर कॉपी आणि सामूहिक गैरप्रकारांच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणांमध्ये परवेक्षक आणि केंद्रप्रमुखांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहकार्य केल्याचे आढळल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करून एकूण ८१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये दहावी परीक्षेतील तीन तर बारावी परीक्षेतील ७८ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मंडळाने दिली.

 

राज्यात दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी मंडळाकडून विशेष अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्यात आली आहे. यंदा बारावीची परीक्षा राज्यातील ३ हजार ३८७ मुख्य परीक्षा केंद्रांवर सुरू असून, त्यापैकी सुमारे ९५ टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत.

बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय (केंद्र क्र. २२४) येथे १० फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान वर्गामध्ये सामूहिक कॉपी होत असल्याचे आढळले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय (केंद्र क्रमांक ००६९) येथेही १० फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी होत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले. या प्रकरणात २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, २१ जणांना निलंबित करण्यात आले आहे.

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पाच शिक्षकांना निलंबित करण्यात आले. केंद्र क्र. ९०६ श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय, जुमडा फाटा येथे १६ फेब्रुवारी रोजी भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान ५८१ विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचे आढळले. शाळांतील २८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील जा. कु. बोमनवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (केंद्र क्रमांक ६१५) येथे राज्यशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान मायक्रो नोट्स तसेच ‘चॅटजीपीटी’चे प्रिंटआउट वापरून सामूहिक कॉपी केल्याचे उघड झाले. या प्रकरणी तीन शिक्षक आणि एका शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बेट मोगरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल (केंद्र क्र. ५२३१) येथे तोतया विद्यार्थी परीक्षा देताना आढळून आला. तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले.

कॉफी गैरप्रकारात सहभागी कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्यात येईल, समिती नेमून निलंबनाची कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी होईल, दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ३ महिने ते १ वर्षापर्यंत निलंबन कारवाई याबरोबरच संबंधित कर्मचाऱ्यांवर दंडात्मक; त्याशिवाय वेतनवाढ रोखणे (मर्यादित कालावधीसाठी) अशा स्वरूपाची कारवाई करण्यात येते. असे मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सांगीतले.

हे सुद्धा वाचा : ज्येष्ठ नागरिक योजना एसटीला ठरली वरदान; पुणे विभागाला तेरा महिन्यात 13 कोटींचे उत्पन्न

वर्ग बारावी मधील गैरप्रकार

पुणे – ४६

नागपूर – २६

छत्रपती संभाजीनगर – ४६

मुंबई – ४२

कोल्हापूर – १

अमरावती – ५९

नाशिक – ५

लातूर – ३५

कोकण – ०

एकूण २३३

वर्ग दहावी मधील गैरप्रकार

पुणे – १४

नागपूर – ८

छत्रपती संभाजीनगर – ४

मुंबई ३

कोल्हापूर – ०

अमरावती – ३

नाशिक – ०

लातूर – ४

कोकण – ०

एकूण – ३६

Web Title: Several employees have been suspended in the state for cheating in the 10th and 12th exams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • hsc exam
  • SSC Examination
  • Teachers

संबंधित बातम्या

‘त्या’ अपघातग्रस्त कुटुंबांना मदत, जखमींना 50 हजार देण्यासाठी पाठपुरावा; पालकमंत्री सावे यांचे निर्देश
1

‘त्या’ अपघातग्रस्त कुटुंबांना मदत, जखमींना 50 हजार देण्यासाठी पाठपुरावा; पालकमंत्री सावे यांचे निर्देश

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे
2

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे

SSC SI Recruitment 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! सब-इस्पेक्टर पदांसाठी अधिसूचना जाहीर, महिलांसाठी अर्ज निशुल्क!
3

SSC SI Recruitment 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! सब-इस्पेक्टर पदांसाठी अधिसूचना जाहीर, महिलांसाठी अर्ज निशुल्क!

एमआयडीसी भोसरीत क्रेन चालकाची अरेरावी, शासकीय कामात अडथळा; धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न
4

एमआयडीसी भोसरीत क्रेन चालकाची अरेरावी, शासकीय कामात अडथळा; धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.