Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्येष्ठ नागरिक योजना एसटीला ठरली वरदान; पुणे विभागाला तेरा महिन्यात 13 कोटींचे उत्पन्न

शासनाने सुरू केलेल्या ज्येष्ठ नागरिक योजना एसटी विभागाला एक वरदान ठरत असून, या योजनेचा ज्येष्ठ नागरिकांकडून मोठा फायदा घेतला जात असल्याचे दिसत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 09, 2026 | 12:05 PM
ज्येष्ठ नागरिक योजना एसटीला ठरली वरदान; पुणे विभागाला तेरा महिन्यात 13 कोटींचे उत्पन्न

ज्येष्ठ नागरिक योजना एसटीला ठरली वरदान; पुणे विभागाला तेरा महिन्यात 13 कोटींचे उत्पन्न

Follow Us
Follow Us:

पुणे : शासनाने सुरू केलेल्या ज्येष्ठ नागरिक योजना एसटी विभागाला एक वरदान ठरत असून, या योजनेचा ज्येष्ठ नागरिकांकडून मोठा फायदा घेतला जात असल्याचे दिसत आहे. केवळ पुणे विभागात याअंतर्गत २०२५ आणि जानेवारी २०२६ या तेरा महिन्यात २६ लाख ५८ हजार ७९३ जेष्ठ नागरिकांनी राज्य परिवहन विभागाच्या बसमधून (एसटी) प्रवास केला असून, या योजनेतून पुणे विभागाला तब्बल १२ कोटी ९७ लाख ५५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे ही योजना यशस्वी ठरली असल्याचेही दिसत आहे.

 

महाराष्ट्र शासनाने महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धे तिकीट योजना आणली. गेल्या काही वर्षात लाल परी म्हणजेच एसटी बसची अवस्था बिकट झाली होती. परंतु, शासनाने ही योजना आणल्यानंतर राज्यभरात त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला असल्याचे दिसत आहे. पुण्यातही ते दिसत असून, पुणे एसटी विभागातून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धे तिकीट ही योजना २६ ऑगस्ट २०२२ पासून सुरू आहे. ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये (साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी) तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली.

आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, किंवा मतदान कार्ड हे ओळखपञ दाखवून प्रवास करू शकतात. त्यानुसार, गेल्या तेरा महिन्यात पुणे विभागातून तब्बल २६ लाख ५८ हजार ज्येष्ठांनी एसटीतून प्रवास केला असल्याचे परिवहन विभागाने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. त्यातून परिवहन विभागाला तब्बल १३ कोटींच्या जवळपास उत्पन्न मिळाले आहे.

जेष्ठ नागरिक योजनेतीन २०२५ मधली लाभार्थी आणि उत्पन्न

महिना लाभार्थी उत्पन्न
जानेवारी २,१४,७५७ ९३,१४,०८९
फेब्रुवारी १,९५,९८९ ९७,६०,१३९
मार्च २,०६६,१५ ९७,५३,५५१
एप्रिल २,१०,२४४ १,०४,८७,००३
मे २,०३,१८६ ९८,१७,३०२
जून  १,९८,२६४ ९७,८७,०१७
जुलै २,०१४,४६  १,०४,४४,५१८
ऑगस्ट २,०१७,७४ ९४,८३,७८९
सप्टेंबर १,९०,४५३  ८७,०५,३९४
ऑक्टोबर  १,९७,१०७ ९३,९१,२६१
नोव्हेंबर  २,१८,२७२ १,१३,७७,३०४
डिसेंबर २,१६,१८२ १,०७,८१,१०७
एकूण २४,५४,२८१ ११,९४,०२,४७४

जानेवारी २०२६

लाभार्थी – २,०४,५१५

उत्पन्न – १,०३,५३,२३०

ज्येष्ठ नागरिक सन्मान योजनेअंतर्गत गेल्या १३ महिन्यात २६ लाख ५८ हजार ज्येष्ठांनी एसटीतून प्रवास करून पुणे एसटी विभागाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. सुरक्षित आणि सवलतीच्या दरात प्रवासासाठी ज्येष्ठांनी एसटीने प्रवास करावा. – अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग

Web Title: St has received good income due to the senior citizen scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pratap Sarnaiik
  • ST buses

संबंधित बातम्या

एसटीत सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य; अकोला विभागात 3 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांकडे नवं कार्ड
1

एसटीत सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य; अकोला विभागात 3 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांकडे नवं कार्ड

Maratha Reservation : जरांगे पाटलांना मंत्र्यांचा थेट इशारा; ‘आमच्या नेत्यांवर बोलाल तर आम्हीही रस्त्यावर उतरू’
2

Maratha Reservation : जरांगे पाटलांना मंत्र्यांचा थेट इशारा; ‘आमच्या नेत्यांवर बोलाल तर आम्हीही रस्त्यावर उतरू’

Sanjay Dutt Marathi Controversy: ‘6 वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, तरी मराठी शिकलो नाही..’;संजय दत्तचं वक्तव्य चर्चेत
3

Sanjay Dutt Marathi Controversy: ‘6 वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, तरी मराठी शिकलो नाही..’;संजय दत्तचं वक्तव्य चर्चेत

पाच वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला दांडी; वॉरंटधारक आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या
4

पाच वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला दांडी; वॉरंटधारक आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.