
शिक्रापुरातील लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलीस तेथे पोहचले अन्…
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात एका लॉजवर बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला आहे. तिन महिलांसह एका लॉज चालकाला ताब्यात घेतले असून, राम साकोरे, विजय हेडगे व गणेश दिलीप पौळ या तिघांवर गुन्हे दाखल ककेले आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या तिन महिलांची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात असलेल्या लॉजवर बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली. त्यांनतर पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, रोहिदास पारखे, विकास पाटील, योगेश आव्हाड, महिला पोलीस शिपाई रुपाली निंभोरे यांनी सदर वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणी एक बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला असता त्यांना एका लॉज चालकासह वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिला मिळून आल्या. दरम्यान पोलिसांनी तिघा महिलांना ताब्यात घेत चौकशी केली असता, लॉज चालक राम साकोरे, विजय हेडगे व गणेश पौळ यांनी आम्हाला वेश्याव्यवसायासाठी प्रोत्साहित केल्याचे महिलांनी सांगितले.
महिला सुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश
दरम्यान पोलिसांनी तिन महिलांसह लॉज चालकाला ताब्यात घेतले असून याबाबत महिला पोलीस शिपाई रुपाली बाळासाहेब निंभोरे (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी लॉज चालक राम साकोरे, विजय हेडगे ( पूर्ण नाव पत्ता माहिती नाही ) व गणेश दिलीप पौळ (सध्या रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. आंबूलगा ता. निलंगा जि. लातूर) यांच्यावर गुन्हा दाखल ककेला. सदर महिलांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघा महिलांना महिला सुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहेत.