Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुटखा माफियांवर पोलिसांची मोठी कारवाई, मोटार ट्रेनिंग स्कूलमधून गुटख्याचा साठा जप्त

मीरा रोडमध्ये ए वन क्लासिक मोटार ट्रेनिंग स्कूल आणि आजूबाजूच्या दोन पानपट्ट्यांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा जप्त केला आहे.पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 18, 2025 | 04:38 PM
गुटखा माफियांवर पोलिसांची मोठी कारवाई, मोटार ट्रेनिंग स्कूलमधून गुटख्याचा साठा जप्त
Follow Us
Close
Follow Us:

मीरारोड/ विजय काते : मीरा रोड परिसरात गुटखा विक्रीचा मोठा अड्डा चालवणाऱ्या माफियावर अखेर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ए वन क्लासिक मोटार ट्रेनिंग स्कूल आणि आजूबाजूच्या दोन पानपट्ट्यांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा जप्त केला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांच्या सततच्या तक्रारींनंतर कारवाई

गेल्या काही महिन्यांपासून मीरा रोड परिसरातील रुग्णालये, शाळा आणि रहिवासी भागांमध्ये खुलेआम गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून वारंवार करण्यात येत होत्या. प्रतिबंधित असलेले तंबाखूजन्य पदार्थ लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सहज उपलब्ध होत असल्याने पालक आणि सामाजिक कार्यकर्तेही या प्रकाराविरोधात आवाज उठवत होते.

मीरा रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अयुब संदे आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई केली. छाप्यादरम्यान ए वन क्लासिक मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. यासोबतच परिसरातील दोन पानपट्ट्यांवरही छापे टाकून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठा जप्त केला आहे.

मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये गुटखा साठा सापडणे धक्कादायक

गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला ती जागा म्हणजे एक मोटार ट्रेनिंग स्कूल असल्याने हा प्रकार अधिकच गंभीर ठरत आहे. या ठिकाणी तरुण मुलं वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेत असतात, त्यामुळे अशा ठिकाणी गुटख्याचा मोठा साठा मिळणे ही चिंताजनक बाब आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, महानगरपालिकेने त्वरित कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली आहे.

घरातही सापडला गुटख्याचा मोठा साठा

छाप्यादरम्यान पोलिसांना एका घरात देखील मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा सापडला आहे. यावरून स्पष्ट होते की, केवळ दुकानेच नव्हे तर घरांमधूनही गुटख्याची अवैध विक्री केली जात होती. पोलिसांनी हा संपूर्ण साठा ताब्यात घेतला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांची पुढील कारवाई काय?

मीरा भाईंदर परिसरात अनेक ठिकाणी, विशेषतः शाळा, रुग्णालये आणि रहिवासी भागांमध्ये असे अन्न व औषध प्रशासनाने बंदी घातलेले पदार्थ विकले जात असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांची पुढील कारवाई कोणत्या ठिकाणी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पोलिसांनी याप्रकरणी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला असून, गुटखा पुरवठादारांपर्यंत पोहोचण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, भविष्यातही अशा कारवाया सुरू राहाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका आणि प्रशासनाची जबाबदारी

गुटख्यासारख्या घातक पदार्थांच्या विक्रीमुळे तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी प्रशासनावर अधिक जबाबदारी टाकत आहेत. फक्त पोलिसांनी कारवाई करून चालणार नाही, तर महानगरपालिका, अन्न व औषध प्रशासन आणि शैक्षणिक संस्थांनीही या प्रकारांवर कडक नजर ठेवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

नागरिकांची प्रतिक्रिया

या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी अजूनही बऱ्याच ठिकाणी गुटख्याची विक्री सुरू आहे. “फक्त एक-दोन ठिकाणी कारवाई करून उपयोग नाही, पोलिसांनी सातत्याने अशा ठिकाणी धाडी टाकाव्यात आणि गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी,” असे मत स्थानिक रहिवासी पारस गुप्ता यांनी व्यक्त केले.

गुटख्याच्या विक्रीविरोधात पोलिसांनी उचललेले हे पाऊल निश्चितच स्तुत्य आहे. मात्र, हा साठा कुठून आला, तो कोण पुरवत आहे आणि या व्यवसायाच्या मुळापर्यंत पोहोचून त्याला आळा कसा घालता येईल, याकडे प्रशासनाने अधिक लक्ष द्यायला हवे. नागरिकांनीही अशा अवैध धंद्यांविरोधात तक्रार करून सहकार्य करण्याची गरज आहे.ठाणे जिल्हा परिषदेचा २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प आज मंगळवार, (दि. १८ मार्च) रोजी सकाळी ११ वाजता, बी. जे. हायस्कूल येथील सभागृहात सादर करण्यात आला.

Web Title: Police take major action against gutkha mafia in mira road gutkha stock found in motor training school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 04:35 PM

Topics:  

  • crime
  • Miraroad Crime case
  • thane

संबंधित बातम्या

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा
1

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा

Solapur Crime: मुलीला मेसेज पाठवल्याचा राग, समेटाच्या बहाण्याने बोलावून तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला; तरुण दोन दिवस बेशुद्ध
2

Solapur Crime: मुलीला मेसेज पाठवल्याचा राग, समेटाच्या बहाण्याने बोलावून तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला; तरुण दोन दिवस बेशुद्ध

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक
3

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Buldhana Crime: ४७ वाहनांवर कारवाई, जिल्ह्यात सर्रास अवैध गौणखनिज उत्खनन
4

Buldhana Crime: ४७ वाहनांवर कारवाई, जिल्ह्यात सर्रास अवैध गौणखनिज उत्खनन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.