Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सात राऊंड फायरिंगनंतर मारेकऱ्यांपैकी एक जखमी? संतोष कनोजिया उर्फ ‘टल्ली’चा शोध सुरू

सात गोळ्या झाडल्या... चार गोळ्या पूर्णेकरांना लागल्या, तर तीन गोळ्या लक्ष्य चुकल्या. मात्र, याच तीनपैकी एका गोळीने मारेकऱ्यालाच जखमी केले का? प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासात आता हाच प्रश्न पोलिसांसमोर आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 05, 2026 | 10:33 AM
पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सात राऊंड फायरिंगनंतर मारेकऱ्यांपैकी एक जखमी? संतोष कनोजिया उर्फ ‘टल्ली’चा शोध सुरू

पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सात राऊंड फायरिंगनंतर मारेकऱ्यांपैकी एक जखमी? संतोष कनोजिया उर्फ ‘टल्ली’चा शोध सुरू

Follow Us
Follow Us:
  • ‘टल्ली’ची ओळख पटली; संतोष कनोजिया उर्फ टल्लीचा शोध सुरू
  • सात राऊंड फायर; चार गोळ्या पूर्णेकरांना लागल्या
  • मारेकऱ्यालाच गोळी लागल्याचा पोलिसांना संशय
 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाने गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. या हत्याकांडाचा तपास सुरू असतानाच आता पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. हत्याकांडात चर्चेत आलेल्या ‘टल्ली’ची ओळख पोलिसांनी पटवली असून, त्याचे नाव संतोष कनोजिया उर्फ टल्ली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागून तो जखमी झाला असावा, असा संशय पोलिसांना आहे. हा जखमी मारेकरी टल्लीच असण्याची शक्यताही तपासात व्यक्त केली जात आहे.

‘टल्ली’ नेमका कोण? पोलिसांकडून शोध सुरू

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ‘टल्ली’ हे नाव चर्चेत आले होते. आता पोलिसांनी त्याची ओळख निश्चित केली आहे. संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि त्याच्या अन्य एका साथीदाराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पप्या शिंदेच्या आईनेही पूर्णेकर यांच्या हत्येमागे टल्लीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे टल्लीची भूमिका या संपूर्ण हत्याकांडात नेमकी काय होती, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

हेही वाचा: Pune Crime: बिबवेवाडीत धक्कादायक प्रकार; अल्पवयीनाच्या हातातील पिस्तुलातून सुटली गोळी, तरुणाच्या पार्श्वभागात घुसली

सात राऊंड फायर; चार गोळ्या पूर्णेकरांना लागल्या

पोलिसांच्या तपासात हत्येच्या घटनेबाबत आणखी काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मारेकऱ्यांनी पूर्णेकर यांच्या कार्यालयात शिरल्यानंतर रिव्हॉल्व्हरमधून सात राऊंड फायर केल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी चार गोळ्या पूर्णेकर यांना लागल्या, तर तीन गोळ्या लक्ष्य चुकवून गेल्या. यातीलच एक गोळी मारेकऱ्यांपैकी एका व्यक्तीला लागली असावी, असा पोलिसांना संशय आहे.

छोट्या कार्यालयात गोळीबार; गोळी रिव्हर्स झाल्याचा संशय

पूर्णेकर यांचे कार्यालय तुलनेने छोटे असल्याने मारेकऱ्यांना जवळून गोळीबार करावा लागला होता. याचवेळी झाडलेल्या गोळ्यांपैकी एखादी गोळी रिव्हर्स होऊन मारेकऱ्यालाच लागली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे घटनास्थळावर आढळलेले रक्ताचे नमुने आणि इतर पुरावे या तपासात महत्त्वाचे ठरणार आहेत.

हेही वाचा: Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट

फॉरेन्सिक तपासातून उलगडा होणार?

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण केले होते. पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने तसेच काडतुसांच्या पुंगळ्या ताब्यात घेतल्या आहेत. या नमुन्यांची तपासणी करण्यात येत असून, गोळीबारासाठी नेमकी कोणती बंदूक वापरण्यात आली, याचाही तपास केला जात आहे.

रक्ताच्या नमुन्यांमुळे तपासाला नवी दिशा?

घटनास्थळावर सापडलेल्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी आणि शस्त्रासंदर्भातील फॉरेन्सिक तपासाचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. रक्ताचा नमुना मारेकऱ्यांपैकी एखाद्याचा असल्याचे स्पष्ट झाल्यास तपासाला नवी दिशा मिळू शकते. त्यामुळे संतोष कनोजिया उर्फ टल्ली याचा या हत्याकांडातील सहभाग आणि तो गोळीबारात जखमी झाला होता का, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. फॉरेन्सिक अहवालानंतर या प्रकरणात आणखी कोणते नवे ट्विस्ट समोर येतात, याकडे पोलिसांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Pradeep purnekar murder case talli santosh kanojia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Murder Case
  • Pradeep Purnekar

संबंधित बातम्या

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं
1

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं

Crime News: नशा करताना वाद; मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून, आरोपी स्वतःच पोलिसांत हजर
2

Crime News: नशा करताना वाद; मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून, आरोपी स्वतःच पोलिसांत हजर

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!
3

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!
4

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.