Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Father Murder Case: “जन्मदात्याच्या लेकानेच घेतला जीव!” घरगुती वादातून मुलानेच वडिलांचे डोके भिंतीवर आदळत आवळला गळा…

Father Murder Case: जन्मदात्या बापाचा लेकानेच संपवला खेळ! किरकोळ वादातून डोके भिंतीवर आदळत आवळला गळा; संभाजीनगरमधील या थरारक हत्येने संपुर्ण शहर हादरले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 16, 2026 | 10:17 AM
Father Murder Case: "जन्मदात्याच्या लेकानेच घेतला जीव!" घरगुती वादातून मुलानेच वडिलांचे डोके भिंतीवर आदळत आवळला गळा...

Father Murder Case: "जन्मदात्याच्या लेकानेच घेतला जीव!" घरगुती वादातून मुलानेच वडिलांचे डोके भिंतीवर आदळत आवळला गळा...

Follow Us
Follow Us:
  • घरगुती वादातून ३३ वर्षीय मुलाने ७३ वर्षीय वडिलांची केली हत्या
  • डोके भिंतीवर आदळून गळा आवळल्याने वडिलांचा जागीच मृत्यू
  • सातारा पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल
Father Murder Case: शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातुन एक काळीज पिळवटून टाकणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका ३३ वर्षीय नराधम मुलानेच आपल्या ७३ वर्षीय जन्मदात्या वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील हमालवाड्यात शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास हा प्रकार घडला. मृतकाचे नाव साहेबराव बाबूराव म्हस्के (वय ७३) असे असून, कैलास साहेबराव म्हस्के (वय ३३) असे अटक केलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील सातारा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुलाला आपल्या ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar: “लॉटरी लागली म्हणून खाऊ घातला पेढा अन्…” ओळखीच्या नराधमाचे विवाहितेला औषध देऊन केले अघोरी कृत्य!

नेमकी घटना कशी घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील रेल्वे स्टेशन परिसरातील हमालवाडा येथे साहेबराव म्हस्के हे आपल्या कुटुंबासह राहत होते. शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास साहेबराव आणि त्यांचा ३३ वर्षीय मुलगा कैलास यांच्यामध्ये काही घरगुती कारणावरून वाद झाला. हा वाद इतка विकोपाला गेला की, संतापाच्या भरात कैलासने वडिलांचे डोके भिंतीवर आदळले आणि त्यांचा गळा आवळला. या भीषण हल्ल्यात साहेबराव गंभीर जखमी होऊन खाली कोसळले.

घटनेनंतर आरोपी कैलासने तत्काळ घटनास्थळावरून काढता पाय घेतला आणि आपल्या भावाला येऊन वडिलांसोबत झटापट झाल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी तातडीने जखमी साहेबराव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर साहेबराव यांना मृत घोषित केले.

हेही वाचा: Bank Manager Suicide: वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याची आत्महत्या; चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे!

सातारा पोलिसांकडून आरोपी ताब्यात

मुलाच्या हातानेच वडिलांचा अंत झाल्याने हमालवाडा आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी अवघ्या काही वेळातच आरोपी मुलगा कैलास याला ताब्यात घेतले असून, नेमका वाद कशावरून झाला होता, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील कोणत्या भागात घडली?

    Ans: रेल्वे स्टेशन परिसरातील हमालवाडा येथे ही घटना घडली

  • Que: या प्रकरणात कोणत्या पोलीस ठाण्यात कारवाई सुरू आहे?

    Ans: सातारा पोलीस ठाण्याच्या पथकाने या प्रकरणी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे

  • Que: आरोपी मुलाने वडिलांवर कसा हल्ला केला?

    Ans: घरगुती वादातून संतापाच्या भरात आरोपीने वडिलांचे डोके भिंतीवर आदळले आणि त्यांचा गळा आवळला

Web Title: Chhatrapati sambhaji nagar hamalwada father murder case sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Crime . Crime News
  • murder case news

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: “लॉटरी लागली म्हणून खाऊ घातला पेढा अन्…” ओळखीच्या नराधमाचे विवाहितेला औषध देऊन केले अघोरी कृत्य!
1

Chhatrapati Sambhajinagar: “लॉटरी लागली म्हणून खाऊ घातला पेढा अन्…” ओळखीच्या नराधमाचे विवाहितेला औषध देऊन केले अघोरी कृत्य!

Rural Students Reading Initiative : मोबाईल नव्हे, पुस्तकांशी मैत्री ! कन्नड तालुक्यात वाचन संस्कारांचा अभिनव उपक्रमम
2

Rural Students Reading Initiative : मोबाईल नव्हे, पुस्तकांशी मैत्री ! कन्नड तालुक्यात वाचन संस्कारांचा अभिनव उपक्रमम

Nagpur: “प्रेमप्रकरणाचा जाब विचारल्याने संपवले!” नागपुरात सराईत गुंडाचा खूनी थरार; अल्पवयीन प्रेयसीच्या मामीचे अपहरण करून..
3

Nagpur: “प्रेमप्रकरणाचा जाब विचारल्याने संपवले!” नागपुरात सराईत गुंडाचा खूनी थरार; अल्पवयीन प्रेयसीच्या मामीचे अपहरण करून..

Sambhajinagar News : पावसाच्या खंडाचा खरिपाला मोठा फटका; संभाजीनगर जिल्ह्याची पैसेवारी ४५.७२ पैशांवर
4

Sambhajinagar News : पावसाच्या खंडाचा खरिपाला मोठा फटका; संभाजीनगर जिल्ह्याची पैसेवारी ४५.७२ पैशांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.