Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Thane Pradeep Purnekar: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांचे हत्या प्रकरण तापले असून याप्रकरणी आता कुटुंबीय आणि समर्थक आक्रमक झाले आहेत. पूर्णेकरांचे पार्थिव ताब्यात घेतल्यानंतर कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर कुटुंबीय आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या दिला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 30, 2026 | 04:30 PM
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Follow Us
Follow Us:
  • प्रदीप पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात
  • कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर कुटुंबीयांचा ठिय्या
  • समर्थकांचे आंदोलन
Thane Pradeep Purnekar: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी (29 सप्टेंबर 2026) रात्री मानपाडा परिसरात पूर्णेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांच्यावर गोळीबारासह शारीरिक हल्लाही करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शवविच्छेदनासाठी पूर्णेकर यांचे पार्थिव मुंबईतील जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी पार्थिव ताब्यात घेतले. पूर्णेकर कुटुंबीय आणि समर्थकांनी सर्व आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करत कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनाची भूमिका घेतली. कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाई होईपर्यंत पार्थिव पोलीस ठाण्याबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समोर येत आहे.

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप

पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांच्यासह कार्यकर्ते कापूरबावडी पोलीस ठाण्याकडे गेले. राम पूर्णेकर यांनी आपल्या वडिलांच्या हत्येमागे कट असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी हत्येचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी तपास सुरू ठेवला आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयितांविरोधात कारवाई सुरू केली आहे. बुधवारी दुपारपर्यंतच्या वृत्तांनुसार पप्या ऊर्फ पपू शिंदे आणि आकाश निमसे यांना अटक करण्यात आली असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारेही तपास केला जात आहे.

पाच संशयितांची नावे समोर; दोघे पोलिसांच्या ताब्यात

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासात निखिल यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे, संतोष कनोजिया आणि आणखी एका अनोळखी व्यक्तीसह पाच संशयितांची नावे समोर आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. यापैकी पप्या शिंदे आणि आकाश निमसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा आणि पोलिसांची एकूण नऊ पथके कार्यरत आहेत. घटनास्थळासह परिसरातील प्रमुख रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, हल्लेखोर घटनास्थळी कसे पोहोचले आणि हल्ल्यानंतर कोणत्या मार्गाने पसार झाले, याचा माग काढण्याचे काम सुरू आहे.

कुटुंबीयांचा संताप; सूत्रधारांच्या अटकेची मागणी

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हल्ल्यात सहभागी सर्व आरोपी आणि हत्येमागील कथित सूत्रधारांना अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्काराची प्रक्रिया पुढे नेणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. पूर्णेकर यांचे बंधू जयनाथ पूर्णेकर यांनीही या हत्येमागील सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. गोळीबार करणारे कोण होते, हल्ल्याचे निर्देश कोणी दिले आणि या हत्येमागे नेमके कोण आहे, याचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या – Navarashtra

Web Title: Pradeep purnekar murder family protest outside kapurbawdi police station thane demands arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • crime
  • thane

संबंधित बातम्या

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
1

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
2

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
3

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
4

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.