Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Welfare Fraud: निराधार महिला पेन्शन योजनेत मोठा SCAM;पती जिवंत असतानाही मृत दाखवून १,७५१ महिलांनी घेतला लाभ

प्रयागराज विभागातील चार जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची एकूण 1,751 प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये प्रयागराजमध्ये 619, फतेहपूरमध्ये 475, प्रतापगडमध्ये 336 आणि कौशांबीमध्ये 321 प्रकरणांचा समावेश आहे. बहुतांश प्रकरणे पडताळणीदरम्यान उघडकीस आली.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 09, 2026 | 02:43 PM
Prayagraj News, Pension Scam, Uttar Pradesh Government, Welfare Fraud

Prayagraj News, Pension Scam, Uttar Pradesh Government, Welfare Fraud

Follow Us
Follow Us:

UP Welfare Fraud: उत्तर प्रदेश सरकारकडून निराधार आणि पतीविना राहणाऱ्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत दिली जाते. मात्र, या योजनेचाही गैरफायदा घेतल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पती जिवंत असतानाही त्यांना मृत दाखवून प्रयागराज विभागातील तब्बल 1,751 महिलांनी निराधार पेन्शन योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. यापैकी सर्वाधिक 619 प्रकरणे प्रयागराज जिल्ह्यात आढळली आहेत.

महिला व बालकल्याण विभागाकडून पतीचे निधन झालेल्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1,000 रुपयांची पेन्शन दिली जाते. या योजनेसाठी अर्ज करताना महिलांना वार्षिक उत्पन्नाचा दाखला आणि पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. विभागाकडून कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा केली जाते.

Union Cabinet reshuffle: मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांची शक्यता! १२ मंत्र्यांना डच्चू मिळण्याचा अंदाज

यंदा प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी सुरू असताना प्रयागराज जिल्ह्यात 619 महिलांनी बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित अर्ज वेगळे काढून लाभार्थींची चौकशी करण्यात आली.

प्रयागराज विभागात सर्वाधिक गैरप्रकार

प्रयागराज विभागातील चार जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची एकूण 1,751 प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये प्रयागराजमध्ये 619, फतेहपूरमध्ये 475, प्रतापगडमध्ये 336 आणि कौशांबीमध्ये 321 प्रकरणांचा समावेश आहे. बहुतांश प्रकरणे पडताळणीदरम्यान उघडकीस आली.

एक लाखांहून अधिक लाभार्थी

सध्या प्रयागराज जिल्ह्यात सुमारे 1 लाख 5 हजार महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. जिल्हा प्रोबेशन अधिकारी सर्वजीत सिंह यांनी सांगितले की, अर्जांच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू असून प्रत्येक अर्जाची सखोल तपासणी केली जाते. बनावट कागदपत्रे आढळल्यास संबंधित अर्ज तत्काळ बाद केले जातात.

व्हिडिओत सोनं-चांदी दाखवणं पडलं महागात; सोशल मिडिया क्रिएटरच्या घरी चोरांची धाड, संपूर्ण घरच केलं साफ

इतर योजनांमध्येही गैरव्यवहार

महिला व बालकल्याण विभागापुरतेच हे प्रकार मर्यादित नसून समाजकल्याण विभागाच्या योजनांमध्येही गैरव्यवहार झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. सामूहिक विवाह योजनेत चुकीच्या पद्धतीने मिळवलेल्या लाभाची रक्कम मागील काही वर्षांत सात जणांकडून वसूल करण्यात आली आहे. वृद्धापकाळ पेन्शन योजनेतही चुकीचे लाभ दिल्याची प्रकरणे समोर आली होती. मात्र, या योजनेत रक्कम वसुलीची तरतूद नसल्याने शासनाचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जाते.

Web Title: Prayagraj pension scam uttar pradesh 2026 fake death certificate welfare fraud up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

‘कमरेला हात लावला तर धुवून टाकेल’, स्टेजवर छेड काढताच डान्सरने तरुणाच्या कानशिलात बजावली; Video Viral
1

‘कमरेला हात लावला तर धुवून टाकेल’, स्टेजवर छेड काढताच डान्सरने तरुणाच्या कानशिलात बजावली; Video Viral

UP Elections 2027: 2024 मधून घेतला धडा; यूपी जिंकण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन,1.76 लाख बूथ पालक, 27,633 शक्ती केंद्रांवर विशेष फोकस
2

UP Elections 2027: 2024 मधून घेतला धडा; यूपी जिंकण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन,1.76 लाख बूथ पालक, 27,633 शक्ती केंद्रांवर विशेष फोकस

UP Crime : पाणीपुरी खायला घालणं महागात पडलं, सनकी आशिकने दुकानदारावर चाकूने केला प्रहार
3

UP Crime : पाणीपुरी खायला घालणं महागात पडलं, सनकी आशिकने दुकानदारावर चाकूने केला प्रहार

खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर फायरिंग, सिक्योरिटी गार्डला मारहाण; स्वस्त फी ठरली कारणीभूत?
4

खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर फायरिंग, सिक्योरिटी गार्डला मारहाण; स्वस्त फी ठरली कारणीभूत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.