(फोटो सौजन्य: Instagram)
मध्य प्रदेशातील शिवपूरीमध्ये रचना आपल्या कुटुंबासोबत राहते. रिपोर्ट्सनुसार, चोरांनी तिचे व्हिडिओ पाहून तिच्या घरात चोरी करण्याचा निर्णय घेतला. रचना सोशल मिडियावर सक्रिय असून ती नेहमीच तिचे दागिने आणि पैशांची रोकड व्हिडिओत दाखवत असे. तिच्या याच व्हिडिओजना बारकाईने बघत चोरांनी रचनाच्या घरात चोरी करण्याचा प्लॅन बनवला. चोर फक्त दागिनेच नाही तर घरात असलेली संपूर्ण कॅश देखील घेऊन गेले. माहितीनुसार, साधारण २ लाखांची नगद, सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी आणि चांदीचे दागिने चोरी केले गेले. चोरी करताना चोरांना घरातील सीसीटिव्ही कॅमेराही दुसऱ्या दिशेला फिरवला होता. त्यांनी घराशेजारील कुंपणही कापत मध्यरात्री २ वाजता घरात प्रवेश केला. कुटुंबाला बाहेर येण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी खोल्यांना बाहेरून कुलूप लावले. यामुळेच चोरांची कोणतीच कृती कॅमेरात कैद होऊ शकली नाही. सकाळी उठल्यानंतर घरातील मंडळींना चोरीचा सुगावा लागला.
View this post on Instagram
दरम्यान या प्रकरणी रचनाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिने नरवर पोलीस स्टेशन आणि मगरुनी पोलीस चौकीला याकडे दुर्लक्ष न करण्याची विनंती केली. जोपर्यंत चोर पकडले जाणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही अशी प्रतिक्रिया रचनाने दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून चोरांचा शोध घेतला जात आहे.
View this post on Instagram
रचना गुर्जर ही इंस्टाग्राम आणि युट्युबवर सक्रिय असून ती नेहमीच रिल्स तयार करते. तिच्या रिल्समध्ये ती नेहमीच सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांचा बडेजाव करताना दिसते. अनेक लोक तिचे हे व्हिडिओज आवडीने पाहतात आणि व्हिडिओला लाईक्स देखील देतात. याच कारणामुळे ती आणखी दागिन्यांचे व्हिडिओज बनवू लागली पण तिची हिच चूक आता तिच्या अंगलड आली आहे. चोरी झाल्यानंतर यूजर्सने आता रचनाच्या व्हिडिओवर कमेंट्स करत ती स्वत:च या चोरीसाठी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. एका यूजरने म्हटले आहे, “आता तर सोनं चोरीला गेलं आता कुठुन सोन घालून दाखवणार”, दुसऱ्या यूजरने म्हटले आहे, “जर तुम्ही इतके दागिने आणि तुमच्या घराची सजावट दाखवली, तर चुकीचे लक्ष वेधले जाणे स्वाभाविक आहे”.






