Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्पवयीन मुलीवर धर्मांतरासाठी दबाव; विवाहाच्या आमिषाने पंजाबमधून पळवून आणले, जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले अन्…

शेखने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पुण्यात आणले. तुझे शिक्षण पूर्ण करतो, असे अमिष त्याने दाखविले. त्याने मुलीच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. माझ्याशी विवाह करायचा असेल तर तुला धर्म बदलावा लागेल, असे मुलीने कुटुंबीयांना सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 12, 2026 | 11:57 AM
अल्पवयीन मुलीवर धर्मांतरासाठी दबाव; विवाहाच्या आमिषाने पंजाबमधून आणले पळवून

अल्पवयीन मुलीवर धर्मांतरासाठी दबाव; विवाहाच्या आमिषाने पंजाबमधून आणले पळवून

Follow Us
Follow Us:

पुणे : पंजाबमधील लुधियाना येथील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पुण्यात आणले. त्यानंतर विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी मोहम्मद रईस मोहम्मद रफीक शेख (वय २१, मूळ रा. फिरोजपूर, मलीहाबाद, लखनौ, उत्तर प्रदेश) बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), तसेच ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीचे वडील हे शिवणकाम करतात. ते मूळचे उत्तर प्रदेशातील फिरोजपूरचे आहे. गेल्या १६ वर्षांपासून ते पंजाबमधील लुधियाना शहरात स्थायिक झाले आहेत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची १७ वर्षांची मुलगी लुधियानातील एका शाळेत शिक्षण घेत होती. १४ ऑगस्ट २०२५ रोजी ती घरातून शाळेत जाते, असे सांगून बाहेर पडली. पण ती घरी परतली नाही. मुलगी घरी न परतल्याने ती बेपत्ता झाल्याची तक्रार वडिलांनी लुधियानातील सराभानगर पोलिसांकडे दिली. नंतर मुलीचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर मुलीने ३० जुलै २०२६ रोजी आईच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.

उत्तर प्रदेशातील मूळगाव फिरोजपूर येथे राहणारा आरोपी तरुण शेख याच्यासोबत पुण्यातील हडपसर भागात वास्तव्य करत असल्याचे तिने सांगितले. मुलीने तिचे वास्तव्याचे ठिकाण (लोकेशन) आईला पाठविले. तेव्हा मुलगी फुरसुंगी भागातील हांडेवाडी रस्त्यावर आरोपीसोबत राहत असल्याची माहिती मिळाली, असे वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे.

PM Modi : “युवा हे केवळ भविष्य..” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स पोस्टद्वारे युवा दिनानिमित्त तरुणांना दिला खास संदेश

‘त्यानंतर मुलीचे वडील आणि काका हे ४ ऑगस्ट रोजी फुरसुंगी पोलीस ठाण्यात आले. पोलिसांच्या मदतीने मुलगी आणि आरोपी शेख याला पोलीस ठाण्यात आणले. शेखने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पुण्यात आणले. तुझे शिक्षण पूर्ण करतो, असे अमिष त्याने दाखविले. त्याने मुलीच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. माझ्याशी विवाह करायचा असेल तर तुला धर्म बदलावा लागेल, असे मुलीने कुटुंबीयांना सांगितले. पंजाबमधून मुलीला पळवून नेल्यानंतर आरोपी मुलीला घेऊन अलीगढ, कर्नाटकातील कोलार येथे नेले. गेले दोन महिने आरोपी मुलीसोबत हांडेवाडी येथे राहत होता’, अशी माहिती फुरसुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांनी सांगितले.

मुलीची वैद्यकीय तपासणी

मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. बाल न्यायालयाने तिला निरीक्षणगृह ठेवले आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पुण्यात दोन गुन्हे दाखल

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ अन्वये पुण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. ५ ऑगस्ट रोजी फुरसुंगी पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. दुसरा गुन्हा ९ ऑगस्ट रोजी खडक पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. फुरसुंगी येथील गुन्ह्यात अल्पवयीन मुलीवर धर्मांतरण कण्यासाठी दबाव आणला होता. खडक पोलीस ठाण्यात एका धर्मगुरुविरुद्ध धर्मप्रसार केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिस उपायुक्त डाॅ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.

Maharashtra Religion Conversion Law : ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६’ राज्यात लागू; काय आहेत तरतुदी !

Web Title: Pressure on minor girl in pune to caste convertion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

Table Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंचा जलवा! ‘या’ चार खेळाडूंची थेट…
1

Table Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंचा जलवा! ‘या’ चार खेळाडूंची थेट…

सावधान, सतर्क! ‘प्राध्यापकांनी ‘या’ कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यास…’; Pune विद्यापीठाचा इशारा
2

सावधान, सतर्क! ‘प्राध्यापकांनी ‘या’ कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यास…’; Pune विद्यापीठाचा इशारा

Pune Graduate Teachers Constituency: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५५ इच्छुकांकडून ९७ अर्जांची उचल
3

Pune Graduate Teachers Constituency: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५५ इच्छुकांकडून ९७ अर्जांची उचल

केवळ ७० रुपयांत मिळेल मुंबईच्या स्ट्रीट फूडचा स्वाद; मदर्स रेसिपीची बॉम्बे सँडविच चटणी…
4

केवळ ७० रुपयांत मिळेल मुंबईच्या स्ट्रीट फूडचा स्वाद; मदर्स रेसिपीची बॉम्बे सँडविच चटणी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.